मोडनिंब – येथे बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांची भागवत कथा भाविकांच्या प्रचंड प्रतिसादात सुरु आहे. या संगीतमय कथेचे दुसरे पुष्प गुंफताना बालयोगी गोपाल महाराज यांनी मल, विक्षेप आणि आवरण असे तीन दोष आहेत. निषिद्ध कर्म करण्याची वासना तिथ मल दोष. स्नानसंध्या केल्याने दोष नष्ट होतात. तर चित्ताची चंचलता झाली की, विक्षेप दोष निर्माण होतो. देवाच ध्यान केल्याने विक्षेप संपून जातो. तिसरा आवरण जो पर्यंत बुद्धीच्या ठिकाणी अज्ञानाच आवरण आहे. एकदा ज्ञान प्राप्त झाले की अज्ञानाच आवरण नष्ट होते.मनुष्य जीवन जगत असताना नित्य नियम असला पाहिजे.कथेचे श्रवण असले पाहिजे. चांगले कर्म असले पाहिजे. आपण जे कर्म केले ते अंतिम समयी भोगून घ्यावे लागते असल्याचे दुसऱ्या दिवशी कथेच्या विवेंचनात सांगितले. कथेचे तिसरे पुष्प गुंफताना जीवनामध्ये साधक अवस्थेत ध्यान महत्वाच असल्याचं गोपाल महाराज कारखेडकर यांनी सांगितलं. रोज ध्यान करा. ध्यानाची परिपक्व स्थिती प्राप्त झाली की जीव भगवत कृपेला प्राप्त होतो. दुःखाची निवृत्ती परमसुखाची प्राप्ती भगवंताच्या ध्यानात आहे. ध्यानानंतर समाधी प्राप्त होते, समाधीनंतर संयम प्राप्त होतो. त्यानंतर एकाग्रता प्राप्त होते. एकाग्रता प्राप्त झाली की ज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त झाल की द्वंद्व अडथळा निघून जातो. तो जीव स्थितप्रज्ञ होत भगवत कृपेला प्राप्त होतो. जीवनात कर्म करा. नियमाच पालन करा.तुमच कल्याण होईल. सत्, तप, पवित्रता आणि दान आहे तो भक्त आहे.मोडनिंब येथे गुरुवार पासून कथेला सुरवात झाली. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपादबाबा यांच्या २८ व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त या संगीतमय सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.श्री संगनबसवेश्वर मठ येथे सप्ताह पार पडणार आहे. रोज सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात टेंभुर्णी, मोडनिंब, अरण व बावी, गिड्डेवाडी, आष्टी, तेलंगवाडी, शेटफळ, जाधववाडी, तुळशी, बैरागवाडी,भेंड येथील हजारो भाविक सहभागी होतात. प्रासादिक अमृत वाणीतून कथा श्रवनाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
दिवंगत पत्रकार रवींद्र पवार यांच्या आठवणींना उजाळा
दिवंगत पत्रकार रवींद्र पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना बालयोगी गोपाळ महाराज कारखेडकर यांनी भावपूर्ण शब्दांत त्यांचे कार्य अधोरेखित केले. “मी येण्याच्या आठ दिवसांपूर्वीच वर्तमानपत्रात बातमी यायची, एवढं त्यांचं काम वेळेवर आणि जबाबदारीने असायचं. आता त्यांचा मुलगाही हे कार्य पुढे चालवत आहे,” असे त्यांनी सांगितले.
मोडनिंब परिसरात भागवत कथेचा प्रचार व प्रसार त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केला. अत्यंत प्रेमळ, जिव्हाळ्याचे आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व असल्याने ते सर्वांना भावायचे. भागवताविषयी त्यांना विशेष आवड होती आणि त्यासाठी त्यांनी मनापासून कार्य केले, अशा शब्दांत महाराजांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला .
























