बार्शी : संविधान दिनाचे औचित्य साधून तसेच मुंबईवरील 26/11 च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आणि निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गौडगाव (ता. बार्शी) येथे ‘एकता महिला मंचच्या वतीने आज, दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी, एका भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
रक्तदान शिबिराच्या प्रारंभी, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ‘एकता महिला मंच’च्या वतीने मान्यवरांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी एकता महिला मंचच्या सदस्या शीतल काजळे, मैना सोनवणे, वर्षा यादव आणि राहुल भड यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी संविधान दिनाचे महत्त्व आणि 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देण्याचा संदेश दिला.

यावेळी ‘एकता महिला मंच’च्या सदस्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत प्रचंड उत्साहाने प्रतिसाद दिला. एकूण 25 सदस्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. हे रक्तदान श्रीमान रामभाई शहा रक्त केंद्र, बार्शी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. रक्तदात्यांना रक्त केंद्रामार्फत भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित अर्चना पारसे, अर्चना जिने, ताजुद्दीन सय्यद, किरण जाधव, बापू ननवरे, राहुल भड तसेच एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी एकता महिला मंचच्या तालुका प्रमुख कविता दसवंत, तालुका कार्यकारणी सदस्या रीना गुरव, वसुधा कुंभार, सानिया सय्यद, स्वाती चव्हाण यांच्यासह सदस्या शीतल काजळे, भाग्यश्री लाटे, मोहिनी भड, मैना सोनवणे, सुखनंदा सुरवसे, महादेवी माने, सविता काजळे, उषा सुतार, अरुणा काजळे, सिंधु दसवंत, अनिता दसवंत, राजश्री गुरुव, वर्षा यादव, मथुरा दसवंत, मंगल काजळे, शामल सुतार, सुरेखा जगदाळे, जयश्री दसवंत, संगीता काजळे, सरस्वती चादरे, मंगल सुरवसे, पद्मजा भड, सारिका सुतार, ज्योति कुंभार, शुभांगी भड, स्वाती भड, पद्मा महाडिक, विद्या महाडिक आणि गावातील अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक भाग्यश्री लाटे यांनी केले, तर कविता दसवंत यांनी उपस्थितांचे आभार मानले. ‘एकता महिला मंच’च्या या उपक्रमामुळे संविधान दिनाचे पावित्र्य आणि शहिदांचे स्मरण एका उदात्त कृतीतून साधले गेले.



















