Thursday, December 11, 2025
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर विद्यापीठाच्या विविध खेळांच्या सराव शिबीरास सुरुवात 

तरुण भारतbyतरुण भारत
November 27, 2025
in sports
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महामहिम राज्यपाल कार्यालय आयोजित महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा जगतातील एक महत्त्वपूर्ण असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर  विद्यापीठाच्या आठ खेळातील सोळा संघाच्या सराव शिबिरास सुरुवात झाली.

यावर्षी या स्पर्धेचे आयोजन स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे  ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. सोलापूर विद्यापीठाकडून या महोत्सवासाठी खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांचा असा एकुण १८७ जणांचा मोठा चमू नांदेडकडे कूच करणार आहे. यात १६२ खेळाडू ( पुरुष व महिला), २४ संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक आणि १ स्पर्धा समन्वयक यांचा समावेश आहे. या स्पर्धेत अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, टेबल टेनिस, बॅडमिंटन व बुद्धिबळ या आठ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

या स्पर्धेच्या अनुषंगाने सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, आणि संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग डॉ. अतुल लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंच्या स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरांसाठी व  तयारीसाठी विशेष नियोजन करण्यात आले.

बास्केटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, आणि बुद्धिबळ या खेळांच्या पुरुष व महिला संघांचे १० दिवसांचे स्पर्धा पूर्व सराव शिबीर विद्यापीठ परिसरात  २२ नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. १ डिसेंबरपर्यंत हे शिबिर होणार आहे. या शिबिरामध्ये ११२ खेळाडू तसेच त्यांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक यांच्या निवासाची व भोजनाची उत्तम व्यवस्था विद्यापीठ परिसरात करण्यात आली आहे.

सरावासाठी व्हॉलीबॉल मैदान (फ्लड लाईटसह), बास्केटबॉल सिंथेटिक ग्राऊंड (फ्लड लाईटसह), कबड्डी मैदान (मॅटसह), आणि खो-खो मैदान यांसारख्या अद्ययावत सुविधा तयार करण्यात आल्या होत्या.

विद्यापीठ परिसराबाहेरील इतर ठिकाणी देखील खेळाडूंसाठी सराव शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. अॅथलेटिक्सचे शिबीर येथील डीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सच्या मैदानावर व टेबल टेनिसचे पार्क मैदानावरील मुळे पॅव्हिलियन हॉल मध्ये तर बॅडमिंटनचे कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथे सुरू आहे. या संपूर्ण तयारी आणि स्पर्धेसाठी बाळासाहेब वाघचवरे यांची क्रीडा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

—–

विद्यापीठाचे खेळाडू निश्चितच चांगली कामगिरी करतील

सोलापूर विद्यापीठाच्या या मोठ्या चमूची विद्यापीठ परिसरात व अन्य ठिकाणी  विविध मैदानावर कसून तयारी सुरू आहे. या क्रीडा महोत्सवात सोलापूर विद्यापीठाचे खेळाडू निश्चितच चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा आहे.

-बाळासाहेब वाघचवरे, समन्वयक

——

हे आहेत विविध खेळाचे प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक

अॅथलेटिक्स : डॉ. अशोक पाटील, डॉ. किरण चोकाककर,धनंजय देशमुख.

बास्केटबॉल : डॉ. स्मिता सुरवसे, डॉ. महेश ढेंबरे, डॉ. प्रशांत तांबिले.

व्हॉलीबॉल : नंदकिशोर देशपांडे, खंडू चव्हाण, डॉ. सुरेश लांडगे.

कबड्डी : सुवर्णा कांबळे, विजय पवार, डॉ. रविंद्र कुनाळे.

खो-खो :डॉ. सुभाष मारकड, डॉ. शिवानंद तोरवी, विशाल होनमाने.

बॅडमिंटन : मकरंद भुजबळ, महादेव वाघमारे,.डॉ. समर्थ मनुकर.

टेबल टेनिस : गुलनार हरकारे,अनिल परमार  प्रा. संतोष गवळी.

बुद्धिबळ :दिपक भोसले, जगदिश चेडे,डॉ. सुरेश भोसले.

Post Views: 65
Previous Post

26/11 शहिदांच्या स्मरणार्थ ‘एकता महिला मंच’च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा!

ताज्या बातम्या

सोलापूरमध्ये कफ सिरपवर मोठी कारवाई! 500 बाटल्या जप्त

December 10, 2025

रात्रीचा पाणीपुरवठा बंद? नागपूर अधिवेशनात मोठा निर्णय

December 10, 2025

ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कळंब तहसीलदारांना निवेदन!

December 10, 2025

कळंब तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

December 10, 2025

लोकमंगल परिवाराचा स्नेहसंवाद मेळावा उत्साहात संपन्न

December 10, 2025

यंत्रमागधारकांनी अत्याधुनिक डाईंग पद्धतीचा अवलंब करावा

December 10, 2025

जिल्ह्य परिषद शाळेत ताबडतोब शिक्षक नेमण्याची मागणी

December 10, 2025

हमी भावाने माल खरेदीची आँनलाईन नोंदीची अट शिथील करावी – चेअरमन तुकाराम ढवळे

December 10, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

चन्नवीर चिट्टें सारख्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाने संधी द्यावी – जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुनशिवाचार्य

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये उत्तम कामे होत असून मोदीसाहेबांचे नेतृत्व चन्नवीर चिट्टे सारख्या देशभरातील कोट्यावधी प्रामाणिक...

मवीआ चा महापौर बसवण्याचे लक्ष्य ठेवू – माजी मंत्री चंद्रकांत खैरे

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - महाविकास आघाडीचा महापौर सोलापूर महानगरपालिकेत बसवण्याचे लक्ष्य ठेवून आम्ही लढणार आहोत. आगामी निवडणुकीत रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे....

वकिलाच्या शिष्टमंडळाने घेतली चंद्रकांत खैरे यांची भेट; उमेदवारी देण्याची मागणी

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग...

उप सभापती अण्णा बनसोडे यांच्या दालनात सोलापूरच्या प्रश्नांचा निपटारा 

byतरुण भारत
December 6, 2025
0

सोलापूर - विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी सोलापूरच्या विविध समस्या व प्रश्नांची सोडवणूक संदर्भात...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0556506

वृत्त संग्रह

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697