पंढरपूर – शहर व परिसरात सोमवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसणार आहे. तर गहू, हरभरा, ज्वारी, मका पिकांचेदेखील मोठे नुकसान होत आहे. आंब्याच्या कैऱ्या गळून पडल्या असून मोहोराचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
पंढरपूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कासेगाव, खर्डी, बोहाळी, उंबरगाव, तिसंगी, टाकळी, कोर्टी, गादेगाव, भाळवणी आदी भागात सोमवारी दुपारी ४ वाजता अवकाळी पाऊस झाला तर सायंकाळी ६.३० वाजता पंढरपूर शहरासह संपूर्ण तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे द्राक्षे बागांवर परिणाम होत आहे.
पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होत आहे. तर गहू, हरभरा, ज्वारी, मका पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. सर्वात जास्त नुकसान आंब्याच्या पिकाचे झाले आहे. आंब्याचा मोहोर गळती झाला असून तयार झालेल्या कैऱ्यांचा झाडाखाली सडा पडला.
























