Wednesday, June 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सिंहगड महाविद्यालयामध्ये शिवजंयती मोठया उत्साहात साजरी

तरुण भारतbyतरुण भारत
February 25, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – १९ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा जन्मदिवस (शिवजंयती) म्हणून साजरा केला जातो.  हा दिवस म्हणजे इतिहासाच्या गौरवशाली क्षणांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. शिवाजी महाराजांनी केवळ एक साम्राज्य स्थापन केले नाही तर एक संस्कृती, एक स्वाभीमानी विचारधारा निर्माण केली.  त्यांच्या स्वराज्य स्थापनेमागील ध्येय, त्याग आणि कष्ट आपण समजून घेतले पाहीजे.  शिवरायांच्या विचाराप्रमाणे आपण एकजूट होऊन, स्वाभीमानाने आणि नितीमत्तेने जीवन जगण्याचा संकल्प करुया.   

राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती अगदी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  शिवाजी महाराज जंयतीच्या उदघाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.चंद्रकांत देशमुख, समन्वयक प्रा.सुमित इंगाले, प्रा. शिवाजी पवार, डॉ. नामदेव सावंत, प्रा. समाधान माळी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेला हार घालून दिपप्रज्वलन करण्यात आले. 

छत्रपती शिवाजी महाराज जंयतीचे औचित्य साधून महाविद्यालयामार्फत पालवी प्रकल्प येथे जाऊन  सर्व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थीवर्गाने शिवजयंती साजरी करुन तेथील अनाथ मुलांना भेट देऊन त्यांना खाऊ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.  महाविद्यालयातील विद्यार्थी ओम पवार व सानीया मुल्ला या विद्यार्थ्यांनी पालवी येथे झालेल्या शिवजयंती उत्सवात शिवरायावर भाष्य केले. त्यांनी आपल्या भाषणात वक्तव्य केले की,  “नमस्कार मावळ्यांनो, शिवभक्तांनो आणि स्वराज्याच्या अभिमानी संततीनो!”

आजचा दिवस केवळ एक तारीख नसून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माचा अभिमानाचा दिवस आहे. शिवरायांचा जन्म हा अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या स्वाभिमानी युगाचा प्रारंभ होता. राजमाता जिजाऊंच्या संस्कारातून घडलेले शिवराय शौर्य, न्याय आणि जनकल्याण यांचे प्रतीक होते. रायगड किल्यावरील राज्याभिषेकाने स्वराज्याचा सूर्य तेजाने उगवला. आज त्यांच्या स्मृतीपुढे नतमस्तक होत आपण स्वराज्याच्या मूल्यांचे जतन करण्याची आणि अन्यायासमोर न झुकण्याची प्रतिज्ञा करूया.  जय भवानी ! जय शिवाजी !

तसेच शिवजंयतीचे औचित्य साधून महाविद्यालयातील संकेत घुटूकडे यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा  व  सृष्टी जगदाळे हिने राजमाता जीजाऊची वेशभूषा केली.  तसेच पालवीच्या संस्थापिका मंगलताई शहा यांनी देखील आपल्या भाषणात विद्यार्थ्यांसाठी संदेश दिला की, मुलांनी आपले चरित्र हे छत्रपती शिवाजी महाराजाप्रमाणे घडवावे, ज्यामुळे आपली संस्कृती जपली जाईल. स्त्रिया आणि मुलींविषयी आपले विचार नेहमी शुद्ध आणि आदरयुक्त असावेत. महाराजांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे वागा आणि आयुष्यात काहीतरी असे साधा जे गौरवाने स्मरलं जाईल.

कार्यक्रम यशस्वी करणेसाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी अविराज साळुंखे, गणेश पवार, आकाश पवार, संकेत खडतरे, हर्षद शिंदे, हषवर्धन गायकवाड, प्रणव शिवारकर, संकेत घुटकूडे, सानीया मुल्ला, सृष्टी जगदाळे, स्नेहा कदम, वैष्णवी देवकर, रेष्मा पठाण, पुर्वा वाखारकर, मयुरी झुरे, राधिका निकम व श्रावणी पवार  तसेच महाविद्यालयातील कर्मचारी प्रभाकर शिंदे तसेच सिक्युरिटी विभाग यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 28
Previous Post

अवकाळी पावसाचा द्राक्षे, आंबा पिकांना फटका

Next Post

विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा जीवनाचा अनुभव अधिक समृद्ध होईल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा जीवनाचा अनुभव अधिक समृद्ध होईल

ताज्या बातम्या

गोकुळच्या ऊसबिलासाठी शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजी तलावात उड्या मारल्या

June 10, 2026

निर्मिती विहार मध्ये ७४ वर्षीय वृद्धाचा गळा दाबून खून #solapurnews #viral

June 10, 2026

सोलापुरात आनंदाने काम करू शकलो कुमार आशीर्वाद

June 10, 2026

गर्भलिंग निदान परीक्षण प्रतिबंध कायदयाचे आशा वर्कर आरोग्य सेवकांना प्रशिक्षण द्या जिल्हाधिकारी

June 10, 2026

आता अपघात स्थळी वेगाने येणार अँम्ब्युलन्स ;जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांचा आदेश

June 10, 2026

नुमवि शाळेत विविध विषयांच्या पाट्या घेऊन मुलांचे केले स्वागत

June 9, 2026
MHT- CET परीक्षेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

MHT- CET परीक्षेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

June 9, 2026
राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने करमाळ्याचे प्रा.बाळकृष्ण लावंड सन्मानित

राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने करमाळ्याचे प्रा.बाळकृष्ण लावंड सन्मानित

June 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0902545

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697