हिंदू धार्मिक शास्त्रानुसार रामभक्त हनुमानाचा जन्म चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. आज हनुमान जन्मोत्सव आहे. या दिवशी बजरंगबलीची विधीपूर्वक पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते.
तसेच आज हनुमानाची जयंती नाही तर जन्मोत्सव साजरा केला जातो. जयंती आणि जन्मोत्सव हे दोन्ही शब्द एकच नाहीत. तर वाढदिवस साजरा करण्याच्या दिवसाला जन्मोत्सव म्हणतात. तसेच जयंती हा शब्द अशा व्यक्तीसाठी वापरला जातो जी या जगात हयात नाही आणि तो दिवस जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.
तज्ज्ञांच्या मते, हनुमान हा अमर आहे. खुद्द श्रीरामांनी त्याला चिरंजीवी म्हणजेच अमरत्वाचे वरदान दिले आहे. हनुमान हा चिरंजीव असल्याने त्याची जयंती साजरी करणं योग्य नाही असं अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळेच हनुमान जयंती नाही तर हनुमान जन्मोत्सव साजरा करतात.