अकलूज – श्री बृहन्मठ वेळापूरचे जेष्ठ मठाधिपती श्री.ष.ब्र.108 शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचा अमृत आणि सुवर्ण पट्टाभिषेक महोत्सवानिमित्त ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात आज सकाळी ध्वजारोहण कार्यक्रम श्री.ष.ब्र.108 गुरूलिंग शिवाचार्य महास्वामीजी (चिटगुप्पा), श्री.ष.ब्र.108 शिवशंकर शिवाचार्य महास्वामीजी (नेरपिंगळाई), श्री.ष.ब्र.108 सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी (नुल), श्री.ष.ब्र.108 मरूळाराध्य शिवाचार्य महास्वामीजी (चिटगुप्पा) आणि श्री बृहन्मठ वेळापूरचे नुतन मठाधीपती श्री.ष.ब्र.108 सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आली… तसेच
पहाटे गुरुगादीस रुद्राभिषेक संपन्न झाला. सकाळी 8.30 वाजता गणेशयाग व महारुद्रयाग स्वाहाकार कार्यक्रम 51 दाम्पत्यांच्या शुभहस्ते संपन्न होवून श्रीगुरूंच्या हस्ते दाम्पत्यांना शुभाशिर्वाद देण्यात आले. दुपारी भजन-किर्तन व संगीत करण्यात आले. त्यानंतर दुपारी 4.00 वाजता नवचंडी याग स्वाहाकार कार्यक्रम 51 दाम्पत्यांच्या शुभहस्ते संपन्न होवून श्रीगुरूंच्या हस्ते दाम्पत्यांना शुभाशिर्वाद देण्यात आले.
सायंकाळी श्री.ष.ब्र.108 शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचे नाणेतुला, श्रीफळतुला, पेढातुला, दूधतुला, गहूतुला, साखरतुला, गुळतुला व तांदूळतुला संपन्न होवून श्रीगुरू हस्ते दाम्पत्यांना शुभाशिर्वाद देण्यात आले. रविवार दिनांक-12.रोजी अय्याचार व शिवदिक्षा संस्कार कार्यक्रम आयोजित केलेला असून त्यासाठी पूर्व नोंदणी सुरू आहे. तसेच त्याच दिवशी दुपारी 4.00 ते रात्री 8.00 या वेळेत पंचाचार्य जगद्गुरूंची भव्य-दिव्य अड्डापालखी मिरवणुक सोहळा (पालखी मैदान ते श्री बृहन्मठ वेळापूर) होणार असून त्यानंतर रात्री 8.00 वाजता हिंदू वीरशैव लिंगायत समाज पंचाचार्य जगद्गुरू यांचे दिव्यसानिध्यात व अनेक शिवाचार्य यांच्या उपस्थितीत धर्मसभा संपन्न होणार आहे.
सोमवार दिनांक13. मुख्य कार्यक्रम होणार आहे पंचाचार्य जगद्गुरूंच्या दिव्यसानिध्यात श्री बृहन्मठ वेळापूरचे जेष्ठ मठाधिपती श्री.ष.ब्र.108 शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना हरिद्रलेपन व अभ्यंग स्नान संपन्न होवून सकाळी 10.30 वाजता पंचाचार्य जगद्गुरु तसेच, उपस्थित शिवाचार्य, संत-महंत, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत धर्मसभा संपन्न होईल आणि नंतर उपस्थितांसाठी महाप्रसाद होईल.
तरी सदरच्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह देशातील सर्व हिंदू वीरशैव लिंगायत समाज बंधु-भगिनींनी व सद्गभक्तांनी सहकुटुंब उपस्थित राहून पंचाचार्य जगद्गुरू दर्शनाचा, कार्यक्रमांचा व गुरूकृपेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास राजकीय शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार ऐतिहासिक वेळापूर नगरी धार्मिक कार्यक्रमाने गजबजून गेली आहे आहेत.
श्री रंभापुरी जगद्गुरु, श्री उज्जैन जगद्गुरु ,श्री काशी जगतगुरु चंद्रशेखर महास्वामी, काशी जगद्गुरु श्री डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी,श्री शैल्य जगद्गुरु या सर्वांचा एकत्रित दर्शनाचालाभ महाराष्ट्रात वीस वर्षानंतर होत आहे आहे
























