भोकर(प्रतिनिधी)येथील पंचायत समिती कार्यालयाचा गलथान कारभार सूरू असून ग्रामसेवक मूख्यालयी राहत नाहीत ग्रामीण भागातून विविध योजनेचे लाभार्थी शालेय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी ग्रामसेवकांना भेटण्यासाठी तालूक्याचे ठिकाणी यावे लागत आहे ग्रामसेवकांनी मात्र अमावस्या पोर्णिमेला ठरवून दिलेल्या ग्रामपंचायतीस भेट देत असल्याचे चित्र दिसून येते याकडे गटविकास अधिकार्यांचे साफ दूर्लक्ष होत आहे.
मागील काही दिवसापासून भोकर पंचायत समितीअंतर्गत कार्यरत ग्रामसेवक आपले कर्तव्य पार पाडत नसल्याचे अढळून येते ग्रामसेवकाकडे ग्रामस्तरावरील सचिव म्हणून पाहिले जाते लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकिय योजनांची माहिती देणे जनतेला विविध प्रकारचे दाखले देणे झाडे लावणे शौचालय बांधणे आदिसह विविध कार्य त्यांचेकडे असताना मूख्यालयी राहून आपली जबाबदारी सांभाळण्यासाठी नेमणूक केलेली असताना उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार भोकर तालूक्यात दिसत आहे.
अनेक खेडेगावच्या नागरिकांना आपल्या गावासाठी ग्रामसेवक कोण आहे हि विचारणा करावी लागते सरपंच आणि ग्रा.पं.सदस्य वगळता अन्य नागरीकांना ग्रामसेवकांचे नावाची माहिती नाही जर ग्रामसेवक मूख्यालयी राहिल्यास त्यांची ओळख निर्माण होईल पण बहूसंख्य ग्रामसेवक कधीतरी ग्रा.प.ला भेट देवून परततात ग्रामसभेला व ध्वजारोहणावेळी उपस्थिती दिसते ग्रामसेवकांचे अर्धे काम रोजगारसेवक सांभाळतात तर काहि गावात ग्रामसेवकांनाच कामे हाताळावी लागतात
ग्रामसेवकांच्या कारभाराकडे गटविकास अधिकार्यांचे अक्षम्य दूर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळते प्रत्येक ग्रामसेवकांना ठरवून दिलेल्या गावात मूख्यालयी राहण्याच्या सूचना वरिष्ठांनी द्याव्यात अशी मागणी ग्रामीण भागातील नागरीक करित आहेत.