कुर्डूवाडी – कुर्डूवाडी नगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणूकीमध्ये शिवसेना उबाटा पक्षाच्या जयश्री संतोष भिसे यांनी राष्टृवादी काँग्रेसच्या सुरेखा निवृत्ती गोरे यांचा 655 मतांनी दारूण पराभव करत विजय संपादन केला तर नगरसेवकपदाच्या विस पैकी तेरा जागा जिंकत राष्टृवादी काँग्रेसने बहुमत संपादन केले. सर्वात महत्वाचे म्हणजे शिवसेना शिंदे गटाला व अपक्षांना एक -एक जागा जिंकता आली. शिवसेना उबाटाला मात्र पाच जागेवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे राष्टृवादी काँग्रेसचा गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे. या निवडणूकीत भाजपा व काँग्रेसचा धुव्वा उडाला असून सर्वच्या सर्व जागेवर पराभव पत्करावा लागला.
@ शिवसेना उबाटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेद्वार जयश्री संतोष भिसे यांना एकुण ६ हजार ६२४ मते, दुस-या क्रमांकावर राष्टृवादी काँग्रेसच्या सुरेखा निवृत्ती गोरे 5 हजार 969 मते,तीस-या क्रमांकावर भाजपाच्या माधवी गोरे यांना 1728 तर चौथ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गटाच्या समिरूनिसा मुलाणी यांना 1091 मते मिळाली. काँग्रेसच्या मनिषा गवळी यांना 281 तर अपक्ष लता मोरे यांना अवघी 42 मते मीळाली.
@ विजयी उमेद्वार ( नगरसेवक) व त्यांना मीळालेली एकुण मते पुढील प्रमाणे
प्रभाग 1 अ. सविता जगताप ( ८२७ राष्ट्रवादी काँग्रेस) , 1 ब आनंद कदम (६७२ राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग 2 अ अमरकुमार माने ( ८२२ राष्ट्रवादी काँग्रेस) 2 ब शाहिस्ता चाऊस ( ७५२ राष्ट्रवादी कॉंग्रेस) ,प्रभाग 3 अ सरस्वती क्षीरसागर (२७३ शिवसेना उबाठा),
ब अंजली गावडे ( ३३१ शिवसेना उबाठा)
4 अ पल्लवी कांबळे (७८१ राष्ट्रवादी काँग्रेस) ,
ब संजय टोणपे ( ५०८ राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग 5 अ अबोली चौधरी (७४८ शिवसेना उबाठा) ,
ब भाग्यश्री पाटील( ८०१ राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग 6 अ मोहसिन मकणू (७१८ राष्ट्रवादी काँग्रेस), ब स्नेहा गवळी ( ८२७ राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग 7 अ जगन्नाथ क्षीरसागर (५९३ राष्ट्रवादी काँग्रेस) , ब रेशमा गोरे( ६०८ शिवसेना उबाठा)
प्रभाग 8 अ शकील तांबोळी( ७६१ अपक्ष ) , ब वृषाली गांधी (९७६ राष्ट्रवादी काँग्रेस),
प्रभाग 9 अ वनिता सातव ( ६०७ शिवसेना) , ब ऋषिपाल वाल्मिकी (५५२ शिवसेना उबाठा)
प्रभाग 10 अ शुभ्रा गोरे (७४२ राष्ट्रवादी काँग्रेस),
ब समीर मुलाणी ( ६२५ राष्ट्रवादी काँग्रेस)
तीस वर्षाचा दोस्ताना अन मामांचा 55 शुभ क्रमांक. वर मेंबर खाली मामा.
मागील तीस वर्षापासुन माजी आ.संजयमामा शिंदे व शिवसेना जिल्हाध्यक्ष धनंजय डीकोळे यांचा दोस्ताना सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रसिध्द आहे.एक अपवाद वगळता कुर्डूवाडी नगरपालिकेवर धनंजय डीकोळे यांची कायम सत्ता आहे.या ठीकाणची निवडणूक कायम मिलीभग करूणच लढली जाते हा येथील जनतेला ठाम विस्वास आहे.हे दोघे एकमेकाच्या विरोधात कायम लढले तरी निवडणूकीनंतर एकच होतात व एकमताने सत्ता चालवतात.यावेळेस दोघांनीही मोठ्या ताकतीने निवडणूक लढवली मात्र जनतेने दोघांनाही सत्तेत ठेवले.जयश्री भिसे यांनी सुरेखा गोरे यांचा 655 मतांनी पराभव केला.55 हा आकडा संपुर्ण निमगावकर माजी आ.संजयमामा शिंदे यांच्यासह त्यांच्या कार्यक्रतेही शुभ आकडा समजतात.शिवसेनेच्या भिसेही 655 मतांनी विजयी झाल्या त्यांच्या विजयातही 55 हा आकडा आहे.यावरूनसुध्दा शहरात चर्चेचा जोर होता.मागील तीस वर्षापासुनचा मेंबर आणी मामा यांचा दोस्ताना याही पाच वर्षात कुर्डूवाडी करांना पहावयास मिळणार असून दोघे मिळून नगरपालीका चालवणार असेच नागरीकामधून चर्चा चालु होती.
माळी समाजाचे प्रचंड विभाजनामुळे पराभव— दत्ता काकडे शहराध्यक्ष राष्टृवादी
नगराध्यक्षपदाच्या उमेद्वार सुरेखा गोरे यांचा पराभव हा माळी समाजामुळेच झाला.त्यांच्या मतात मोठी फुट झाली.मात्र आमचे 13 उमेद्वार निवडणून आले बहुमताने सत्ता आली.तर तीन उमेद्वारांचा थोडक्यात पराभव झाला. नगराध्यपदाच्या पराभवासह नगरसेवकांच्या विजयांची देखील माझी जबाबदारी आहे.शेवटी आमचे नेते माजी.आ.संजयमामा शिंदे जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.
दोन्ही पक्षांच्या विजयी रँली—
नगरपालिकेतील टेंभूर्णी रोड येथील गोडावूनमधील मतमोजणी संपल्यानंतर शिवसेना उबाटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेद्वार जयश्री संतोष भिसे या 655 मतांनी विजयी झाल्यानंतर टेंभूर्णी रोड येथुन विजयी रँली काडण्यात आली.उघड्या जिप मधून जयश्री भिसे,साक्षी डिकोळे,साक्षी भिसे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी संतोष भिसे,साहील भिसे हेही विजयी रँलीत सहभागी झाले होते.भगव्या गुलालाने सर्वजण माखून गेले होते.ढोल ताशाच्या गजरात शहरातुन मिरवणूक काढण्यात आली.यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय डिकोळे हेही उपस्थीत होते. दुस-याबाजूला याच रोडवरून राष्टृवादी काँग्रेसने 13 जागा जिंकुन बहुंमत मिळवल्याने त्यांचे सर्व विजयी उमेद्वारांनी शहरातुन वाजत गाजत मिरवणूक काडली.यामध्ये राष्टृवादीचे शहराध्यक्ष दत्ता काकडे, बापूसाहेब जगताप, बाबा गवळी यांच्यासह सर्व राष्टृवादीचे कार्यकर्ते सहभागी होते.नगराध्यक्षपदाचे पराभव झालेले उमेद्वार जयश्री गोरे या परभव दिसु लागल्याने दुस-या राउंडनंतर निराश चेह-याने घरी निघून गेले.
@ जल्लोष करताना शिवसेनेची विजयी रँली
@ विजयी आनंद साजरा करताना राष्टृवादीचे कार्यकर्ते.
@ राष्टृवादी काँग्रेसच्या उमेद्वार भाग्यश्री पाटील यांना उचलुन घेवून पती श्रीकांत पाटील यांनी आनंद साजरा केला.
प्रभाग क्रमांक दहामध्ये राष्टृवादी काँग्रेसचे मुस्लिम समाजाचे नेते समिर मुलाणी हे विजयी झाल्याने येथील भाजप उमेद्वार विशाल इंगोले या दोघांच्या कार्यकर्त्यामध्ये वाद झाला.वादाचे मुळ म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ” जय श्री राम! ” च्या घोषणा देत गेल्याने वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.मात्र वेळीच पोलीसांच्या समयसुचकतेने वाद वाढला नाही.
अन बारामतीची कन्या विजयी झाली.
निवडणूक प्रचाराच्या रणधूमाळीत शिवसेनेचा बालेलेकील्ला असलेल्या प्रभाग आठ मधून महेश उद्योगपती महेश गांधी यांच्या पत्नी वृशाली गांधी यांनी राष्टृवादी काँग्रेस कडून उमेद्वारी घेतली.अवघड वाटणा-या प्रभागामधून या दोघा पतीपत्नींनी अगदी गणीमी काव्याने प्रचार केला.प्रचारादरम्यान राष्टृवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार कुर्डूवाडीत आले असता खास करून त्यांनी वृशाली गांधी यांचा “बारामतीची कन्य ” असा उल्लेख करून त्यांना हायलाईट केले होते तेव्हापासुन त्या सर्वांच्या डोळ्यासमोर आल्या याचा परिणाम त्या 251 मतांनी विजयी झाल्या. आता त्यांना बारामती प्रमाणे प्रभाग आठचा विकास करण्याचे आव्हाण आहे.
वृशाली व महेश गांधी.पती पत्नी.
कुर्डूवाडी करांनी कसल्याही दबावाला बळी न पडता अतीशय चांगली साथ दीली.शहरातील कडवट शिवसैनिकांनी ताकतीने काम केले.यापुढे शहराच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही.
धनंजय डिकोळे.
शिवसेना उबाटा जिल्हाध्यक्ष .


























