Sunday, September 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मंगळवेढ्यात भाजपला मोठा धक्का! तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा आवताडे विजयी

तरुण भारतbyतरुण भारत
December 22, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा – शहरामध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून नगराध्यक्षपदी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा बबनराव अवताडे 212 मताने विजयी झाले आहेत. आमदार समाधान आवताडे यांच्या भाजपला रोखण्यात विरोधकांना यश आले आहे.

सुरुवातीपासूनच निवडणुकीमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते, विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून ही निवडणूक गाजली होती.

नगराध्यक्ष

सुनंदा बबनराव आवताडे (9850 – विजयी)

सुप्रिया अजित जगताप (9638)

नगरपालिका विजयी उमेदवार नावे व मिळालेली एकूण मते

प्रभाग 1

मेटकरी प्रतीक्षा : (821), येताळा भगत : (952)

प्रभाग 2

नागर गोवे (1135), प्रमोद सावंजी (1154)

प्रभाग 3

विद्या अवघडे (777), सोमनाथ आवताडे (बिनविरोध)

प्रभाग 4

विजया गुंगे (1176), चंद्रकांत घुले ( 1270)

प्रभाग 5

प्रीती सूर्यवंशी (778), अनिल बोदाडे (825)

प्रभाग 6

गौरीशंकर बुरकुल (1815), मनीषा मेटकरी (1708)

प्रभाग 7

अश्विनी धोत्रे (1095), सोमनाथ माळी ( 1039)

प्रभाग 8

सोमनाथ हुशारे ( 1356), सावित्री कोंडूभैरी ( 1136)

प्रभाग 9

प्रशांत गायकवाड ( 879), तरननुम दारुवाले (568)

प्रभाग 10

प्रवीण खवतोडे ( 1326), सीमा बुरजे ( 1013) हे नगरसेवक विजयी झाले आहेत.

मंगळवेढा शहराचा कायापालट व्हावा, सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागावेत, जनतेचे राहणीमान उंचावले पाहिजे हा विकासाचा अजेंडा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनंदा बबनराव आवताडे यांनी प्रसिध्द केला होता.

पहिल्याच मिटींग मध्ये ५०० चौरस फुटांच्या आतील मिळकतदारांना मालमत्ता करात सवलत देण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठवणार.

थकित मालमत्ता कर, गाळे भाडे या वरील दंड व व्याज माफ करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणार.

नगरपालिका गाळे हस्तांतरीत (ट्रान्सफर) प्रक्रिया सुलभ करणार. नगरपालिकेच्या सर्व शॉपिंग सेंटर चे नूतनीकरण करून त्याठिकाणी शौचालयाची व्यवस्था करणार.

ठेकेदारीतील सफाई, पाणीपुरवठा तसेच डाटा एन्ट्री ऑपरेटर या सर्वच कर्मचाऱ्यांना कायम करणेबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार.

प्रधानमंत्री घर योजना यामध्ये नगरपालिका स्वहिस्सा म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये अनुदान देणार.

महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी नगरपालिका स्तरावर पन्नास हजार अनुदान देणार. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करतानाच भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभार करण्याची ग्वाही.

शहरातील सर्व भागांना शुद्ध व पुरेसे पाणी उच्च दाबाने मिळावे यासाठी आवश्यकतेनुसार नियोजन करण्यात येईल.

मंगळवेढा नगरपरिषदेची पाणीपट्टी कमी करणार. संत चोखामेळानगर व संत दामाजीनगर, संत कान्होपात्रानगर या लगतचा भाग हद्द वाढ करुन, हद्द वाढ होईपर्यंत या सर्व भागांना नगरपालिकेच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणार.

नगरपालिका प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी भौतिक सुविधा तसेच आधुनिक डिजीटल शैक्षणिक साधने उपलब्ध करुन देण्यात येतील.

मंगळवेढ्यातील सर्व खेळाडूंसाठी शहरालगतच भव्य आणि सुसज्ज असे क्रिडा संकुल निर्माण करणार.

मंगळवेढा शहरातील गणेश उद्यानाचे सुशोभीकरण व आधुनिकीकरण करणार. शहरातील नविन आठवडा बाजारामध्ये पार्किंगची व विशेषतः महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था करणार.

शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहराच्या विविध भागात उपकेंद्रांची उभारणी करण्यात येईल.

गटार व सांडपाणी व्यवस्थापनासाठी भूमिगत गटारे तसेच गरजेनुसार अन्य पर्यायी व्यवस्था करण्यात येतील.

रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व डास मुक्त मंगळवेढा व्हावे यासाठी नियमित फवारणी तसेच सांडपाणी व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येईल.

सार्वजनिक ठिकाणावरील कचरा विल्हेवाट व घरगुती घनकचरा व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील व आवश्यकतेनुसार घंटागाडींची संख्या वाढविण्यात येतील.

शहरातील उद्योग – व्यवसाय वाढीस लागावेत त्यादृष्टीने संतभूमीचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येईल.

महात्मा बसवेश्वर, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा व अन्य संतांची स्मारके व समाधीस्थळ विकसित करुन पर्यटकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

धूळमुक्त, प्रदुषणमुक्त व खड्डेमुक्त शहर अशी ओळख मंगळवेढा नगरीची होईल यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल असे सुनंदा आवताडे यांनी जाहीरनाम्यातून सांगितले आहे.

विकासाचा अजेंडा घेऊन काम आणि सेवेची आवड असलेल्या उमेदवारांना तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी देण्यात आलेल्या आहेत.

येणाऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सुनंदा आवताडे यांनी सांगितले होते.

Post Views: 185
Previous Post

कुर्डूवाडीत शिवसेनेला नगराध्यक्षासह पाच जागा तर राष्टृवादी तेरा जागेवर विजयी

Next Post

राजस्थानी समाजाला मिळावे भाजपाकडून प्रतिनिधित्व

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राजस्थानी समाजाला मिळावे भाजपाकडून प्रतिनिधित्व

ताज्या बातम्या

विश्वबंधु दिनानिमित्त संस्कार वर्ग शिबिराचे उत्साहात उद्घाटन

विश्वबंधु दिनानिमित्त संस्कार वर्ग शिबिराचे उत्साहात उद्घाटन

September 13, 2026

प्रभाग क्र. ११ कुंभार गल्लीतील वर्षानुवर्षे बंद असलेला बोअर सुरू

September 13, 2026

गणेशोत्सवानिमित्त सी. बी. खेडगी महाविद्यालयात व्याख्यानमाला

September 13, 2026

बैलपोळ्याच्या मिरवणुकीत रायफलचा हवेत बार; परितेत गोळीबाराने खळबळ

September 13, 2026

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #news #marathinews #latestnews

September 12, 2026

गुन्हे शाखेने केली महत्वाची कामगिरी

September 12, 2026

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला #solapurnews #news

September 12, 2026

पोलिसांना काळजी कर्मचाऱ्यांच्या मनस्वास्थ्याची #viral #solapurnews #news #marathinews

September 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1199248

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!