शहरातील मानवी वस्तीत वानरांचा सुळसुळाट झाला आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत साठ ते सत्तर नागरिकाना वानराने चावा घेऊन जखमी केले आहे. त्यात काही गंभीर जखमी झाले काहीजणांची गंभीर अवस्था आसल्याने काही जनावर दवाखाण्यात उपचार चालू आहेत.पायी चालणाऱ्याच्या अंगावर पाठीमागून उडी मारुन, दुचाकीवरील चालकाला गंभीर जखमी केले.वानराच्या कृर्त्यामुळे अनेकजण जखमी झाले.दिसेल त्याला चावत असल्याने नागरिक भयभीत झाल्याचे कळताच वनविभागाने पिंजरे लावून वानरे पकडले.
लोहा शहरात वानरांने हदौस घातला आहे. फेरफटका मारत असलेल्या तरुणावर वानराने हल्ला करून चावा घेऊन पायाची फेंडरी फोडून गंभीर जखमी.
अति उन्हाळ्यामुळे जंगलातीलपाणी साठे कोरडेठक पडले जंगलात वन्य प्राण्यांना खाण्यास काही मिळत नसल्याने वानर,माकडे व अन्य जंगली प्राण्याचे कळप शहर,खेडेगाव व वस्तीत येत आहेत.
वानराचा कळप पत्र्याच्या घरावर उडी मारली की घरावरील पञाचे नुकसान होत आहे पण घरातील वस्तु , लाहान मुले किंव्हा वयस्कर व्यक्ती जखमी होत आहेत छतावर वाळण टाकलेले पापडी, शेवाई, चना, भुईमूग शेंगा खाऊन नासधूस करत आहेत पण त्यांना हाकलण्याचा पर्यंत केला की अंगावर येऊन चावा घेऊन जखमी करत आहेत.या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. इंदिरा नगर परिसरातील गुरुकृपा शाळे लगत राहणाऱ्या कुटुंबातील आठ वर्षीय बालकाला शरीरावर तीन ठिकाणी कडाडून चावा घेतल्याने सदरील मुलगा गंभीर जखमी झाला होता. बीडवई नगर भागातील आलोक अरुण मिसाळ हा तरुण रात्री आठ वाजताच्या सुमारास जेवण करून अंगणात फिरत असताना अचानक वानर आले आणि डाव्या पायाच्या फेंडरीला कडाडून चावा घेवून रक्त बंबाळ केले त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचारानंतर नांदेडला हलविण्यात आले वनविभागाने पिंजरे आणुन चावा घेणाऱ्या वामनराव पकडले.
वन विभागाचे उपवन संरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक ठाकुर, वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे, वनपरिमंडळ अधिकारी क्यादरवाड, वनरक्षक पी आर घुगे, वनसेवक नारायण शेवडीकर, नरसिंग बगाडे