सांगोला – पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सांगोला महाविद्यालय व ग्रामपंचायत शिवणे (ता. सांगोला) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरचे उद्घाटन शिवणे उत्साहात पार पडले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी सां.ता.उ.शि.मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड तसेच सूर्योदय फाउंडेशनचे अनिल इंगोले, शिवणे विद्यालयाचे उपाध्यक्ष प्रकाश वाघमोडे, सरपंच दादासाहेब घाडगे, उपसरपंच प्रियांका शेळके, ग्रा.वि.अधिकारी पांडुरंग एकतपुरे, तलाठी जयश्री कल्लाळे, ग्रा.पं.सदस्य उदयसिंह घाडगे, कुसुम घाडगे, नामदेव जानकर, अंबादास भाटेकर, सुनीता घाडगे, संजय वलेकर, सुनीता इरकर, रंपाबाई ऐवळे हे उपस्थित होते.
यावेळी दादासाहेब घाडगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, शिवणे हायस्कूलचे प्राचार्य विजयकुमार वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल इंगोले यांनी महाविद्यालयाच्या विनंतीला मान देऊन १०० मोठी झाडे दान दिली. या दिलेल्या वृक्षांचे लागवड करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शिवणे हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी, सांगोला महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सदाशिव देवकर, सूत्रसंचालन डॉ.भाग्यश्री पाटील यांनी केले. आभार डॉ.रेणुकाचार्य खानापुरे यांनी मानले.



























