Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अर्ज भरणे, छाननी प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक पद्धतीने पार पडेल : डॉ. ओम्बासे 

तरुण भारतbyतरुण भारत
December 23, 2025
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज दि. 22 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रे व मतमोजणी केंद्रांवरील सुविधांसह निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत दुसरी समन्वय बैठक महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याची तयारी सर्व राजकीय पक्षांनी दर्शविली.

          या बैठकीत मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मतदारांसाठी सोयी, सुरक्षा व्यवस्था तसेच मतमोजणी केंद्रांवरील नियोजन यावर चर्चा करण्यात आली. यासोबतच नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया, अर्जांची छाननी, निवडणूक जाहिरातींसाठीचे नियम, तसेच कॉर्नर सभा व प्रचार कार्यक्रम राबविताना घ्यावयाची परवानगी व आचारसंहितेचे पालन याबाबत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ही बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली. या बैठकीचे सूत्रसंचालन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले.

        यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले की, अर्ज भरणे व अर्ज छाननी ही प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक पद्धतीने पार पडेल. कोणतीही अपूर्ण माहिती किंवा नियमबाह्य बाब आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच जाहिराती व कॉर्नर सभा घेण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी आवश्यक असून, निर्धारित वेळ, ठिकाण व ध्वनीमर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील.राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परस्पर समन्वय साधून निवडणूक प्रक्रिया शांततामय व सुरळीत पार पाडावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. कोणत्याही प्रकारचा नियमभंग होणार याची दक्षता घ्यावी , असेही त्यांनी स्पष्ट केले.

       शासकीय किंवा खाजगी शाळांमधील शिक्षकांनी प्रचारात सहभाग घेतला तर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या निवडणुकीसाठी एकूण  1 हजार 118 मतदान केंद्र असणार आहेत. महापालिकेच्या बीएलओ कडून सर्व मतदारांना स्लिपा वाटप करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितले.

             यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखा अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर, उपजिल्हाधिकारी, रो.ह.यो. अंजली मरोड,उपजिल्हाधिकारी, भूसंपादन अभिषेक देशमुख,उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, उपविभागीय अधिकारी, भैरप्पा माळी,उपविभागीय अधिकारी, विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे,उपविभागीय अधिकारी, जयश्री आव्हाड, सहायक आयुक्त गिरीष पंडित यांच्यासह विविध राजकीय  प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री सिद्धेश्वर यात्रा संदर्भात विषय निवडणूक आयोगाकडे मांडला 

महापालिका निवडणूक प्रक्रिया दरम्यानच श्री सिद्धेश्वर यात्रा आहे. यामुळे ही निवडणूक आठ दिवस पुढे ढकलावी अशी सूचना एका प्रतिनिधींनी मांडली. याबाबत लेखी मागणीही करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात निवडणूक आयोगासमोर हा मुद्दा मांडण्यात आला आहे. त्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे या बैठकीत उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्पष्ट केले.

Post Views: 62
Previous Post

ढोल ताशांच्या गजरात इच्छुकांनी दिल्या मुलाखती

Next Post

सांगोला महाविद्यालयाच्या शिवणे येथील श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सांगोला महाविद्यालयाच्या शिवणे येथील श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन उत्साहात

ताज्या बातम्या

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यात स्व. रतनचंद शहा यांच्या २० व्या पुण्यतिथी निमित्त  अभिवादन 

July 25, 2026

कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर; सोलापूर जिल्ह्यातील १,०७८ शेतकऱ्यांना दिलासा

July 25, 2026
आंबेगाव येथे चिमुकल्यांचा भक्तीसागर! जि. प. शाळा व अंगणवाडीच्या वतीने भव्य दिंडी सोहळा संपन्न

आंबेगाव येथे चिमुकल्यांचा भक्तीसागर! जि. प. शाळा व अंगणवाडीच्या वतीने भव्य दिंडी सोहळा संपन्न

July 25, 2026
आषाढी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी आलेल्या जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या

आषाढी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी आलेल्या जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या

July 25, 2026

ज्येष्ठ नागरिकांच्या स्वअर्जित मालमत्तेच्या संरक्षणाला उच्च न्यायालयाचा दुजोरा – सुनेची रिट याचिका फेटाळली

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त आमदार अभिजीत पाटील यांनी घेतले माढा येथील श्री विठ्ठल मंदिरात दर्शन

आषाढी एकादशीनिमित्त आमदार अभिजीत पाटील यांनी घेतले माढा येथील श्री विठ्ठल मंदिरात दर्शन

July 25, 2026

माढ्याच्या कसबा पेठ विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी

July 25, 2026
पुस्तकातून उलगडणार ॲड. पी. आर. क्षीरसागर यांचा संघर्षमय जीवनप्रवास

पुस्तकातून उलगडणार ॲड. पी. आर. क्षीरसागर यांचा संघर्षमय जीवनप्रवास

July 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0998955

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!