शिक्षण हा काही विशेषाधिकार नसून तो प्रत्येकाचा अधिकार आहे आणी प्रत्येकाला तो बिनचूकपणे मिळायलाच हवा.असा दंडक असणारे,आपल्या राज्यातील मुला मुलींना शाळे त न पाठवणाऱ्या पालकांना एक रुपये दंड करणारे,शिक्षणाच्या बाबतीत अतिशय दूरदृष्टी बाळगणारे श्री.छत्रपती शाहू महाराज.
आज महाराजांची जयंती..आणी त्या अनुषंगाने आपल्या जय हिंद फूड बॅंकेतर्फे दर वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही गरजू,आर्थिक मागासलेल्या विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.सदर शैक्षणिक साहित्यात संपूर्ण विषयांसाठी लागणाऱ्या वह्या,कंपास व शालेय बॅग इ.समाविष्ठ आहे.
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त जय हिंद फूड बँक तर्फे 100 विद्यार्थ्यांना देण्यात आले शालेय साहित्य
अन्नपुर्णा फाउंडेशन संचलित जयहिंद फुडबँकेच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटल येथे चालणाऱ्या अन्नदान महासेवा या उपक्रमात सोबत च *दर वर्षी प्रमाणे पढाई या उपक्रमा अंतर्गत 100 गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले.
जयहिंद फुडबँकेच्या माध्यमातून सिव्हिल मध्ये उपचार घेण्याऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाची सोय जयहिंद फुडबँकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच 25 निराधार वृध्दांना दोन वेळचे डब्बे देण्यात येत आहे सोबतच संस्थे तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सुरेश तमशेट्टी, जे डी प्रतिष्ठान चे विजय शिंदे हे होते तर जय हिंद फूड बँकेचे
सतिश तमशेट्टी, अमर शिंदे, शुभम बल्ला, गोविंद राजुल, विपुल पुल्ली, हे उपस्थित होते.