जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे आज सकाळी कर्करोगाने निधन झाले. यामुळे गोयल यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.
गोयल आणि त्यांची पत्नी हे दोघेही कर्करोगाने ग्रस्त असल्याने त्यांनी अंतरिम जामीन मागितला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारला. परंतु त्यांना त्यांच्या पसंतीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली होती.
अनिता गोयल यांचा जेट एअरवेजच्या कामकाजात सहभाग होता आणि त्या कार्यकारी उपाध्यक्ष होत्या.
गोयल यांना शिक्षा का झाली ?
गोयल यांना सप्टेंबर २०२३ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने कॅनरा बँकेकडून जेट एअरवेजला मिळालेल्या ५३८.६२ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग आणि गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नीलाही नोव्हेंबर २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र अनिता गोयल यांना त्यांच्या प्रकृतीमुळे जामीन मंजूर करण्यात आला होता.