निवडणुका डोळ्या समोर ठेवून जुमलेबाज व चॉकलेट अर्थ संकल्प
बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात – माजी आमदार संतोष सांबरे
तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड 28 जुलैआगामी विधानसभा निवडणूकीत लोकसभे सारखी फजिती होऊ नये या साठी घोषणाचा कोरडा पाऊस, आश्वासनांची जुमलेबाजी आणि सर्वसामान्य नागरिकांना गाजर दाखविणारा अर्थसंकल्प आहे, खोट्या घोषणाचा महापूर केल्यामुळे निधीची उपलब्धता कुठून करणार, योजणांच्या पूर्ततेसाठी बजेट तरतूद कशी करणार या बद्दल कुठली ही ठोस भूमिका जाहीर केली नाही,
शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थ्यांना भूल थापा देऊन फसवणूक करणारा अर्थ संकल्प आहे, खोट्या आणि फसव्या घोषणा बघून हे एका वर्षाचं अर्थ संकल्प आहे की पाच वर्षाचं या बद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात शंका आल्याशिवाय राहणार नाही,
एकूणच भाजप च्या जुमलेबाज, खोटारड्या आणि फसव्या संस्कृतीचा कित्ता गिरवणारा अर्थ संकल्प आहे, जाता जाता राज्याला खड्यात घालणारा निवडणूक संकल्प पत्र आहे असे माजी आमदार संतोष सांबरे यांनी सांगितले