सोलापूर : सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील सौंदर्या कोल्हापुरे, आरती आगसे व साक्षी बहिरवाडे या खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या बेसबॉल संघात स्थान प्राप्त केले आहे. हा संघ बारामती येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
या खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. भक्तराज जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
——
फोटो ओळ: यशस्वी खेळाडू सौंदर्या कोल्हापुरे, आरती आगसे व साक्षी बहिरवाडे


















