सोलापूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण हाक्के यांनी बंडखोरी करत माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्राध्यापक हाक्के हे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयात अवतरले त्यामुळे या ठिकाणी उपस्थित सर्वच माध्यमांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्या वेशभूषेत हंटर कमिशन समोर ते गेले त्याच महात्मा फुले यांच्या विचाराचा मी कार्यकर्ता म्हणून देशाच्या संसदेत फुलेंचा विचार घेऊन जाण्याची भूमिका माझी आहे. या म्हाडा लोकसभा मतदारसंघात ओबीसी विजयी समाजाची अकरा लाख मते आहेत त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ही माझी उमेदवारी असल्याचे हाक्के यांनी सांगितले.