भोकरदन : शिक्षण विभाग सतत या ना त्या कारणाने सतत प्रसिद्धीच्या झोतात असतो. येन केन प्रकारे न गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि प्राथमिक शिक्षणाचा बट्ट्याबोळ करण्याचे जणू काही तथाकथीत तज्ञ लोकांनी महाराष्ट्रामध्ये विडे उचललेले आहेत. यामध्ये ज्यांच्या खाजगी संस्था आहेत असे राजकारणी तसेच ज्या अधिकाऱ्यांच्या खाजगी संस्था आहेत ते अधिकारी सामील आहेत. प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची बदनामी करणे शाळांना सोयी सुविधा न पुरवणे शाळातील विद्यार्थी पळून नेणे इत्यादी गोष्टी सतत सुरू असतात
गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांच्या जागा भरलेल्या नव्हत्या.राज्यातील अनेक समाजसेवकांनी त्यासाठी आंदोलन केले.लढे उभारले संघर्ष केला शेवटी एकदाचे मुहूर्त सापडले आणि शिक्षकांच्या काही जागा भरल्या गेल्या अजूनही बऱ्याच जागा रिक्त आहेत. त्या जागा भरण्यासाठी आता मुहूर्त कधी निघेल सांगता येत नाही. परंतु ज्या शिक्षकांच्या नेमणुका झाल्या ते शिक्षक शाळेवर रुजू होतात न होता तोच लगेच साक्षरता अभियान राबवण्याची युक्ती आता या लोकांच्या डोक्यात आलेली आहे. त्यासाठी मग शाळेतील शिक्षकांना नेमणे वेगवेगळ्या ठिकाणी साक्षरता अभियान राबवण्यासाठी पाठवणे आणि वयोवृद्ध लोकांना शिकवण्यासाठी प्रेरित करणे!
राज्यातील साक्षरता वाढवण्याचा हा गोंडस उपक्रम राबवण्यासाठी कोणत्या तज्ञाच्या डोक्यातून आता ही कल्पना निघाली सांगता येत नाही. परंतु आता तशा बातम्या प्रसारित झालेल्या आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या अनेक शिक्षक डेप्युटेशन वर दुसरीकडे पाठवल्या गेले अनेक शिक्षकांना कार्यालयीन कामे दिल्या गेली त्यातल्या त्यात निवडणुका झाल्या महसूल विभाग अनेक शिक्षकांना राबवून घेतो कामे देतो त्यांच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांना बसवून ठेवतो. ते मामाच्या गावाला सासुरवाडीला जाऊन येतात पगार उचलतात
अशी परिस्थिती असताना शिक्षकांना राबवून घेणे आणि विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे या गोष्टी सतत घडत आलेल्या आहेत. आता साक्षरता अभियान राबवण्याचा उपक्रम सुद्धा गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव असून तो हाणून पाडणे गरजेचे आहे. समाजातील ज्यांना ज्यांना गरिबांच्या या जिल्हा परिषद शाळा आणि प्राथमिक शिक्षणाबद्दल कळवळा असेल त्या सर्वांनी या लढ्यामध्ये सामील झाले पाहिजे. आवाज उठवला पाहिजे राज्यातील अनेक तरुण बेकार आहेत
उच्चशिक्षित आहे त्यांच्या हाताला काम नाही त्यांना नोकऱ्या नाहीत त्यासाठी ही लोक प्रयत्न करत असताना दिसत नाहीत. माझं मत आहे की या लोकांना प्रत्येक गावामध्ये नियुक्त्या द्याव्यात आणि यांच्याकडून साक्षरता अभियान राबवून घ्या त्यांना योग्य असे मानधन द्या आणि काही काळानंतर त्यांना सुद्धा नोकरीमध्ये सामावून घ्या परंतु असे सोयीस्कर काम करण्याकडे कोणाचाही कल दिसून येत नाही. यांना फक्त येण केन कोणत्याही प्रकारे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे आहे आणि त्या शाळा बंद पाडायच्या आहे असे यावेळी बोरसे यांनी सांगितले,