सोलापूर- गैबीपीर उर्दू प्राथमिक स्कूल सोलापूर येथे सत्यशोधक महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी शाहु-फुले आंबेडकर मुस्लीम विचार मंचाचे अध्यक्ष हाजी के. बी. नदाफ हे कार्यकमाचे अध्यक्ष होते तर अभियंता बाबूराव म्हेत्रे यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेवर हार घालून अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी प्रस्तावना व स्वागतशाळेचे मुख्याध्यपक अ .मजीद शेख यांनी केले. बाबूराव म्हेत्रे यांनी महात्मा फुले यांनी समाजातील अशपृस्ता ‘जातिभेद आणि अन्यायविरुध लढा’ या विषयवर सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुणे सोजल राऊळ यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांनी शाळा स्थापनासाठी केलेल्या प्रवासबद्दल माहिती दिली. जमीअत उलेमा हिंदचे सचिव हसीब नदाफ यांनी ज्योतिबा फुले यांनी शेतकरी व समाजासाठी केलेले कामाची माहिती दिली. बोधी वृक्ष संस्थेचे अमोल वाघमारे यांनी महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणासाठी योगदान दिल्याबद्दल माहिती दिली. शिक्षिका मर्सरत शेख यांनी ‘महात्मा फुले व त्यांचे कार्य’ या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यकमाचे अध्यक्ष हाजी के. बी. नदाफ यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांचे कार्यबद्दल मार्गदर्शन केले व महात्मा फुले यांचे पाच पुस्तक पाहुण्यांना भेट दिले. कार्यकमात व्हाइस ऑफ मिडियाचे जिल्हा अध्यक्ष तौफिक नदाफ, सेवानिवृत मंडळ अधिकारी बसवराज संगेपाग, निलोफर शेख, शबाना जमादार, सलमा नदाफ, सुमैया शेख, यासीनबी शेख आदी पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शबीर अहमद शेख यांनी तर आभार अकबर मुतवल्ली यांनी मानले.























