मागील 10 वर्षात भाजपला यंदा बहुमतापेक्षा कमी संख्याबळ मिळाल्याचे पहिला मिळत आहे. त्यामुळे आता केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन करण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
याबाबत आताच मिळालेल्या माहितीनुसार, भाजपला केंद्रात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांची भूमिका महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. दोन्ही पक्षांनी भाजपवर दबाव तयार करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे वृत्त सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, नितीशकुमार आणि चंद्राबाबू यांनी लोकसभेचे अध्यक्षपदावर दावा केला असल्याची माहिती मिळत आहे. यावर आता भाजप नेतृत्त्व काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाकडे लक्ष लागले आहे.
सध्या देशपातळीवरील समीकरणं काय?
▪️ एनडीए आघाडी – 294
▪️ इंडिया आघाडी – 232
▪️ इतर – 17