भोकरदन / जालना : संपूर्ण जालना जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या भोकरदन नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज रविवारी जाहीर झाला असून, अत्यंत लढतीमध्ये चुरशीच्या लढतीमध्ये शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मिर्झा समरीन नाज वसीम या निवडून आल्या आहेत.
दरम्यान अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत तुतारीने काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देत नगरपरिषदेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या विजयामुळे नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर आता मिर्झा समरीन नाज वसीम विराजमान झाल्या आहेत.
या निवडणुकीत सुरुवातीपासूनच मोठी चुरस पाहायला मिळाली. मतमोजणीअंती समोर आलेल्या आकड्यांनुसार कोणत्याही एका पक्षाला निर्विवाद बहुमत मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. या नगर परिषद निवडणुकीत तुतारीला (राष्ट्रवादी – श.प. पक्ष) ९ जागा आणि भारतीय जनता पक्षाला ९ जागा मिळाल्या असून काँग्रेस पक्षाला केवळ 2 जागा मिळवता आल्या आहे.
◼️ नगराध्यक्षपदावर ‘तुतारी’चा शिक्का
नगरसेवक पदाच्या शर्यतीत भाजप आणि तुतारी यांच्यात ९-९ अशी बरोबरी झाली असली, तरी सर्वात महत्त्वाची असलेली नगराध्यक्षपदाची जागा तुतारीच्या उमेदवाराने जिंकली आहे. मिर्झा समरीन नाज वसीम यांनी विजय मिळवत भोकरदन पालिकेवर तुतारीचा झेंडा फडकवला आहे. गेल्या काही काळापासून भोकरदनच्या राजकारणात काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे, मात्र या निकालाने राजकीय समीकरणे बदलली आहेत. काँग्रेसच्या केवळ २ जागा निवडून आल्या आलेल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला नगराध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणण्यात यश आले आहे. या विजयानंतर शहरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि तुतारी वाजवत जल्लोष साजरा केला.भोकरदन नगरपरिषदेचा किल्ला ‘तुतारी’च्या ताब्यात !
◼️ नगराध्यक्षपदी मिर्झा समरीन नाज वसीम ; काँग्रेसला मोठा धक्का
भोकरदन : संपूर्ण जालना जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या भोकरदन नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला असून, यात ‘तुतारी’ (राष्ट्रवादी काँग्रेस – श.प. पक्ष) ने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत तुतारीने काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देत नगरपरिषदेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या विजयामुळे नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर आता मिर्झा समरीन नाज वसीम विराजमान झाल्या आहेत.
या निवडणुकीत सुरुवातीपासूनच मोठी चुरस पाहायला मिळाली. मतमोजणीअंती समोर आलेल्या आकड्यांनुसार कोणत्याही एका पक्षाला निर्विवाद बहुमत मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. या नगर परिषद निवडणुकीत तुतारीला (राष्ट्रवादी – श.प. पक्ष) ९ जागा आणि भारतीय जनता पक्षाला ९ जागा मिळाल्या असून काँग्रेस पक्षाला केवळ 2 जागा मिळवता आल्या आहे.
◼️ नगराध्यक्ष पदासाठी झालेले मते
१ मिर्झा समरीन नाज वसीम बेग ६०८२ ( तुतारी श .प. गट )
२ आशाबाई एकनाथ माळी ५३३९ (भाजपा )
३ देशमुख प्रियंका प्रतिक ३९६४ (काँग्रेस पक्ष )
४ कुरेशी सानिया कौसर शेख ३९४ (अजित पवार गट)
◼️ प्रभागनिहाय विजयी उमेदवार प्रभाग
१ शर्मा भुषण बाबूप्रशाद (धनुष्यबाण शिंदे गट)
१ रेखा द्वारकाधीश बिरसाने ( भाजपा )
२ पठाण अस्मतवेगम बशीरखा ( तुतारी श .प.)
२ शाह अजहरअली इनूसअली ( तुतारी श .प.)
३ देशमुख सुरेखाबाई बाळू ( तुतारी श .प.)
३ पठाण आमेर शफिक ( तुतारी श .प. गट )
४ पठाण बिस्मिल्लाहवी सलीमखाँ (काँग्रेस पक्ष )
४ पठाण शफीक खॉ महेताब खॉ ( तुतारी श .प. गट )
५ जाधव गयाबाई रमेश (काँग्रेस पक्ष)
५ जाधव रणवीरसिंह लक्ष्मणराव ( भाजपा )
६ देशपांडे निलीमा प्रवीण ( भाजपा )
६ थारेवाल सुमित जयेश ( भाजपा )
७ पाथरे चंचलाबाई रामदास ( भाजपा )
७ मोरे विपक नारायण ( भाजपा )
८ वेग कुरेशानी शमिम ( तुतारी श .प. गट )
८ पगारे चंद्रकांत किसन ( तुतारी श .प. गट )
९ भारती शिला अभिजीत ( तुतारी श .प. गट )
९ कबीर शब्बीर अब्दुल. ( तुतारी श .प. गट )
१० लता शंकरराव सपकाळ ( भाजपा )
१० सहाने राजाराम रामकिसन (भाजपा )
मिर्झा समरीन नाज वसीम बेग नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शरद पवार गटाच्या समर्थकांनी शहरात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.



























