कुर्डूवाडी – पराभूत उमेदवाराच्या घरावर तसेच नातेवाईकांच्या घरावर, दारात गुलाल टाकून जातीवाचक शब्द वापरत शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारासह सात जणांवर ॲट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संगीता दिलीप इंगोले यांनी कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी यांचा मुलगा विकास(तात्या) इंगोले आणि विजयी उमेदवार समीर मुलाणी हे नगरपालिका निवडणूकीत एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत होते. या निवडणूकीत समीर मुलाणी हे विजयी झाले.
मुलाणी यांची विजयी मिरवणूक इंगोले यांच्या व नातेवाईकांच्या दारातून जात असताना त्यांच्या घरावर तसेच दारात गुलाल टाकून जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळ केल्याप्रकरणी संगीता इंगोले यांच्या फिर्यादीवरुन निवडून आलेले नगरसेवक समीर मुलाणी यांच्यासह जमीर मुलाणी,अमीर मुलाणी, मुश्रफ मुलाणी, सब्बीर शेख,जिलाणी तांबोळी व गफार शेख सर्व. रा.कुर्डुवाडी यांच्यावर ॲट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















