Tuesday, February 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आमदार अभिजीत पाटील आणि भगिरथ भालके यांच्या आघाडीचा परिचारक, काळे आणि पाटलांना धक्का

तरुण भारतbyतरुण भारत
February 10, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ पैकी जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तर जागांवर परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. दुसरीकडे पंचायत समितीच्या निवडणूकी मध्ये देखील आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारत परिचारकांच्या नेतृत्वाखालील तालुक्यातील पंचायत समितीच्या सत्तेला मोठा सुरुंग लावल्याचे निकाला नंतर स्पष्ट झाले आहे.
दरम्यान नगरपालिका तसेच महानगरपालिका निवडणूकीत ज्या प्रमाणे मोठ्या प्रमाणावर क्राँसव्होटिंग झालेले दिसून आले त्याच पध्दतीने तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकी मध्ये अनेक गट आणि गणांमधून क्राँसव्होटिंग झाल्याचे निवडणूक निकाला नंतर समोर आले आहे. या झालेल्या क्राँसव्होटिंगचा फटका देखील अनेक मातब्बर उमेदवारांना बसल्याचे दिसून आले. या बरोबरच निवडणूकीच्या तोंडावर पक्षांतर करुन भाजपाशी घरोबा केलेल्या कल्याणराव काळे, समाधान काळे आणि गणेश पाटील यांना देखील मतदारांनी साफ नाकारल्याचे निवडणूक निकालावरुन दिसून आले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अभिजीत पाटील आणि विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख नेते भगिरथ भालके यांनी अगदी प्रचार सुरु झाल्या नंतर केलेली युतीची घोषणा मतांचे विभाजन न झाल्यामुळे त्यांच्या दृष्टीने फायद्याची ठरल्याचे दिसून आले.   
दरम्यान येथील तहसील कचेरी समोरील शासकीय गोदामा मध्ये सोमवारी (ता.९) दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. प्रत्येकी एक गट आणि दोन गणांची अशा प्रकारे १६ टेबलवर आठ गट आणि सोळा गणांची मतमोजणी केली जात होती. यावेळी मतमोजणी नंतर आपआपल्या उमेदवारांच्या विजयश्रीची घोषणा झाल्यानंतर शासकीय गोडाऊन समोरील रेल्वे मैदानावर निकालाच्या प्रतिक्षेत असलेले त्यांचे कार्यकर्ते विजयी उमेदवाराला खांद्यावर घेऊन जल्लोष करीत होते. यावेळी गुलालाची मुक्तउधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी देखील केली जात होती.मतमोजणी नंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला होता. सकाळ पासूनच शासकीय गोडाऊन कडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आलेली होती. त्यामुळे निकाला नंतर शहर आणि तालुक्यात कुठेही अनुचित घटना घडली नसल्याचे सांगण्यात आले. 
दरम्यान मतमोजणी नंतर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या करकंब जिल्हा परिषद गटाच्या पहिल्या निकालाने भाजपाने आपले खाते उघडले. करकंब गटातून परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या आदिनाथ देशमुखांनी विरोधी अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब देशमुख यांचा पराभव केला.
तालुक्यातील बऱ्याच वर्षापासून (कै.) यशवंतभाऊ पाटील त्यांचे पुत्र (कै.) राजुबापू पाटील आणि सध्या गणेश पाटील यांची एकहाती सत्ता राहिलेल्या भोसे गटातून धक्कादायक निकाल समोर आला आहे. कारण निवडणूकीच्या अगोदर विठ्ठल परिवाराला सोडचिठ्ठी देवून भाजपाशी घरोबा केलेल्या भोसे गावचे सरपंच गणेश पाटील यांच्या मातोश्री प्रफुल्लता पांडुरंग पाटील यांना पराभवाला समोरे जावे लागले. त्या ठिकाणी आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार षण्मुखी भारत कोरके यांचा विजय झाला.
गोपाळपूर गटातून भाजपाच्या दुर्गा गोपाळ अंकुशराव या मोठ्या फरकाने विजयी झाल्या. शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रियांका पराडे यांचा त्यांनी दारुण पराभव केला. वाखरी गटात सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांचे बंधु समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविलेली होती. त्यांच्या विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार मयुरी बागल या निवडणूकीच्या रिंगणात होत्या. या निवडणूकीत मयुरी बागल यांनी मोनीका काळे यांचा पराभव करीत बाजी मारली. रोपळे आणि भाळवणी गटात देखील आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचा गजर ऐकावयास मिळाला.
——————–
चौकट : ( जिल्हा परिषद गट निहाय विजयी व पराभुत उमेदवार )

(करकंब गट ) – आदिनाथ देशमुख ( विजयी – भाजपा ). भोसे गट ) – षण्मुखी भारत कोरके ( विजयी- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी). ( वाखरी गट ) – मयुरी बागल ( विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस ).( गोपाळपूर गट ) – दुर्गा गोपाळकृष्ण अंकुशराव ( विजयी – भाजपा ).( रोपळे गट ) – गितांजली हनुमंत साळुंखे ( विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस).(भाळवणी गट) – सुप्रिया गायकवाड (विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस).( लक्ष्मीटाकळी गट ) – नंदकुमार वाघमारे ( विजयी, भाजपा ) आणि ( कासेगाव गट ) —- मतमोजणी सुरु आहे — 
—————–

पंचायत समिती गणनिहाय विजयी उमेदवार
( करकंब गण ) – राहुल पुरवत (विजयी, भाजपा ) आणि ( उंबरे गण )- शहाजी मुळे ( विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस ).
( भोसे गण )- पुनम पवार ( विजयी, भाजपा ) आणि ( गुरसाळे गण )- महादेव पाटील (विजयी,राष्ट्रवादी काँग्रेस).
( गोपाळपूर गण )- रंजना आण्णा शिंदे (विजयी,भाजपा) आणि (पुळूज गण ) – ज्योती शिवाजी पांढरे ( विजयी, भाजपा ).
( वाखरी गण ) – निखील अरविंद गोसावी ( विजयी, भाजपा) आणि (पटवर्धनकुरोली गण)- प्रमिला झांबरे ( विजयी,राष्ट्रवादी काँग्रेस ).
( रोपळे गण ) – विजया विलास भोसले ( विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस ) आणि ( सुस्ते गण )- सावली अतुल गायकवाड (विजयी,राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार पक्ष).
(भाळवणी गण )- विजय मोहन शिंदे ( विजयी,- भाजपा ) आणि (पळशी गण) – अक्काताई लोखंडे ( विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस ).
( लक्ष्मीटाकळी गण ) – वंदना फाटे ( विजयी, भाजपा ) आणि (खर्डी गण ) – शुभम आगावणे ( विजयी, भाजपा )  
( कासेगाव गण )-  आणि  ( सरकोली गण ) –  मतमोजणी सुरु आहे.
—————-  
फोटोओळी : पंढरपूर – जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल घोषित झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करुन मोठा जल्लोष केला.

Post Views: 14
Previous Post

मोहोळ तालुक्यात भाजपाने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नूतनीकरण त्वरित पूर्ण करा 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नूतनीकरण त्वरित पूर्ण करा 

ताज्या बातम्या

धाराशिव च्या भूम तालुक्यात विजयानंतर कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसत केली तोडफोड. #public #news

February 10, 2026

आमदार रोहित पवार सांगणार अजित पवार यांच्या अपघाता संदर्भाची माहिती.#public #marathinews #ajitpawar

February 10, 2026

चेष्टा पडली महागात गमावला जीव. #public #crime #solapurnews #viral #maharashtranews

February 10, 2026

‘ ‘ आयुष्याची शिदोरी ‘ : सहज, सोप्या भाषेतील काव्याविष्कार : डॉ. शिवाजी शिंदे

February 10, 2026

कबरीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या चिमुकल्यावर काळाचा घाला

February 10, 2026

हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे दुहेरी यश

February 10, 2026

बार्शीत ‘हर घर रमाई’ उपक्रमाचा जागर; माता रमाईंची जयंती साजरी

February 10, 2026

भागवत शिंदे भारत श्री मास्टर्स स्पर्धेत देशात पाचवे ..

February 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0671398

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697