मंठा / जालना : मंठा शहरातील बस स्थानकामध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढून बस स्थानकामध्ये 50 ते 100 जणांचा जमाव करून राडा केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पाच जणा विरोधात मंठा पोलीस ठाण्यात पोस्को यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की, मंठा शहरातील बस स्थानकामध्ये गेल्या काही दिवसापासून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुलीच्या छेडछाडीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच तारीख 17 बुधवार रोजी सायंकाळी हिवरखेडा येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढली. बस स्थानकामध्ये मोठा राडा झाला. यातील आरोपितांनी फिर्यादीच्या नातेवाईकास 50 ते 100 जण असे गैर कायद्याची मंडळी जमावून बेदम मारहाण केली. यानंतर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून मंठा पोलिसात नासेर रब्बानी तांबोळी, इल्यास रब्बानी तांबोळी यांच्यासह इतर तीन जनावर पॉस्को कलमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे हे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर घटनेनंतर मंठा शहरांमध्ये काहीकाळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मंठा बस स्थानकामध्ये प्रवासी व मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीच यंत्रणा किंवा उपाय योजना दिसून येत नाही. मंठा बस स्थानकामध्ये परिसरातील नागरिकांनी दोन ते तीन चोर वाटा तयार केल्या आहेत.
या चोरवाटास वाहतूक निरीक्षक यांनी मुख संमिती दिली आहे. बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात छेडछाडी प्रकरण होत आहेत.आणि या चोरवाटातून चोर पळून जातात या चोरवाटामुळे अनेक घटना देखील घडू शकतात.त्याचबरोबर येथील रिक्षा पॉईंट अनाधिकृत असून यांच्याकडे कुठल्याही परवाना नसल्याचे कळते.परंतु , यावर कुठलाच विभाग कार्यवाही करत नसल्याने येथील बस स्थानक नसून रिक्षा स्थानक झाले आहे. त्याचबरोबर शहरातील बहुतांश व्यापारी व इतरचे काहीजण या ठिकाणी आपली वाहने उभी करून व स्थानकाला पार्किंग स्थळ केले असल्याचे दिसून येते.


























