सोलापूर – मोबाईल च्या वाढत्या व्यसनामुळे तरुण पिढी अडचणीत येत आहे. मोबाईल द्वारे काही विघातक पोस्ट फॉरवर्ड करण्याने सुद्धा आपले करिअर बिघडवू शकते.आपण सर्वजण देशाचे नागरिक आहोत पण जबाबदार नागरिक होण्यासाठी युवक पिढींनी विध्वंसक कार्यापासून दूर राहून त्याचा मुळापासून नायनाट करण्यासाठी सदैव दक्ष राहिले पाहिजे असे प्रतिपादन निवृत्त पोलिस निरीक्षक नागेश गायकवाड यांनी केले.
संगमेश्वर महाविद्यालय येथे विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ” मी जबाबदार नागरिक होणार” या विषयावरील व्याख्यान प्रसंगी श्री.गायकवाड बोलत होते.
श्री.गायकवाड पुढे बोलताना म्हणाले की आज मोबाईल पुन्हा एकदा शाप की वरदान याचा विचार करण्याची वेळ आली आहे.तरुण वयात मोबाईल चा अतिवापर यामुळे करिअर मधील आपले ध्येय गाठणे अडचणीचे बनत आहे.काही मुले मुली मोबाईल च्या माध्यमातून काही गुन्ह्यात अडकतात व पर्यायाने सर्व कुटुंबालाही अडचणीत आणत आहेत.त्यासाठी पालकांनीही आपल्या मुलांकडे सातत्याने लक्ष दिले पाहिजे असे म्हटले.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा.भीमाशंकर बिराजदार यांनी आपल्या ओघवत्या व मिस्किल शैलीतून मुलामुलींना मार्गदर्शन केले.आपले आई व वडील हेच सर्वात मोठे दैवत आहेत.आई वडील स्वतः कष्ट करुन मुलांना उच्च शिक्षण देत असतात याचे भान मुलामुलींनी ठेवले पाहिजे असे सांगून विद्यार्थ्यांनी व्यायाम,अभ्यास,संस्कारक्षम जीवन जगावे व आपल्या परिवाराचे नाव मोठे करावे असे म्हटले.यावेळी आज युवा पिढी फॅशन च्या नावाखाली न शोभणारे तोकडे कपडे पेहराव करणे,विनाकारण पाश्चात पद्धतीचे अनुकरण करणे या गोष्टी समाजाला हानिकारक ठरत आहेत असा मोलाचा संदेश प्रा.बिराजदार यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य ऋतुराज बुवा हे होते.तसेच उद्योगपती निळकंठ कोनापुरे,बसव सेंटर चे अध्यक्ष ./राजेंद्र मायनाळ, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे समन्वयक गुरुलिंग कन्नुरकर ,विजापूर रोड मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक सदस्य विजय शाबादी,उत्सव अध्यक्ष रविराज भोपळे ,आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. मायनाळ यांनी कुमारस्वामी यांच्या कार्याची माहिती देत युवकांनी मोठी स्वप्ने बाळगावीत विघातक कृत्यांपासून लांब रहावे असे म्हटले.
प्रारंभी विजय शाबादी यांनी विजापूर रोड मध्यवर्ती मंडळाने युवक पिढीला देशाचा जबाबदार नागरिक बनण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.संगमेश्वर महाविद्यालयात हा शुभारंभाचा कार्यक्रम असल्याचे सांगितले.
शेवटी सुजाता म्हेत्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमास निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे, यादव,सौ.उमा डोमनाळे मंडळाचे पदाधिकारी बिळेनी बिराजदार, सिद्धराया होर्तीकर,सिद्राय्या माविनमर,गंगाधर पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महाविद्यालयाचे विद्यार्थी ओम बारसकर, सौंदर्या पुजारी,समर्थ मडडी मी यांनी केले तसेच कार्यक्रमासाठी प्रा.शीला रामपूरे व प्रा.विष्णू विटेकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
_——————————————–
*प्रा.बिराजदार…महाराष्ट्र आयकॉन*
*या कार्यक्रमात प्रा.भीमाशंकर बिराजदार यांना कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रा.ऋतुराज बुवा यांच्या हस्ते श्री.सिद्धेश्वरांची मूर्ती देऊन विशेष सत्कार करण्यात आला.*
*कार्यक्रमातील व्याख्याते नागेश गायकवाड व प्रा.भीमाशंकर बिराजदार हे दोघेही संगमेश्वर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत हे विशेष*

















