!! खामखेडा येथे कालिका देवी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा !!
जाफराबाद/प्रतिनिधी
जाफराबाद — खामखेडा येथे कालिका देवीचे मंदिर ठरणार परिसरातील एकमेव मंदिर 28 /29 /30 जून या तीन दिवसांच्या कालावधीत खामखेडा येथे कालिकादेवी ची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून यासाठी संपूर्ण गावकरी उल्हासात सहभागी झाले आहे येथे शेकडो वर्षांपूर्वी पासून कालिका देवीचे छोटेसे मंदिर असून त्याच दगडाला शेंदूर लावलेला होता गावकऱ्यांनी या दगडाला मूर्ती स्वरूपात आणण्यासाठी कालिका देवीची भव्य दिव्य मूर्ती आणली
तीन दिवस ब्रम्हव्रंदांच्या वेदोक्त मंत्रोपचारात हा सोहळा होत असून तीन दिवस धार्मिक विधीने संपूर्ण गाव यात सहभागी झाले आहे 30 जून रोजी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी शेकडो भाविकांना महाप्रसाद वाटप वाटप होणार आहे यासाठी गावातील एकनाथ महाराज फदाट रामदास जाधव कल्याण जाधव महादूफदाट भाऊ सिंग फदाट रामदास फदाट अनिल जाधव सावकार प्रभाकर सुसर यांच्यासह असंख्य महिला पुरुषांनी सहकार्य केले आहे