फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना एका भरधाव कारने चिरडल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
या घटनेत दोन 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतकांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे.
ही घटना रविवारच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ घडली आहे.
या प्रकरणी पोलीसांनी आरोपी कारचालकाला अटक केली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.
नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ हा भीषण अपघाताची घटना घडलीय.
धक्कदायक बाब म्हणजे यातील आरोपीने घटना स्थळावरून पळून जाण्याच्या नादात कारला मागेपुढे केल्याने अपघाताची तीव्रता अधिक वाढली असून यात 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतकांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे. तर यातील सात मजुरांची प्रकुर्ती चिंताजनक असल्याचे सांगितले जात असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.