देशात लवकरच लोकसभा निवडणुक पार पडणार आहे. ही निवडणूक ७ टप्प्यात होईल. पहिला टप्पा १९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. निवडणुकीत मतदान करण्यापूर्वी तुमचे मतदान केंद्र कुठे आहे हे जाणून घ्या, यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल आणि तुम्ही वेळेवर मतदान केंद्रावर पोहोचू शकाल. तुम्ही घरबसल्या तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवरून मतदान केंद्राची माहिती मिळवू शकता.
निवडणुकीच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात येते, जेणेकरून भारतातील प्रत्येक नागरिक वेळ काढून त्याच्या/तिच्या आवडत्या पक्षाला आपले मौल्यवान मतदान करू शकेल. अशा प्रसंगी, तुमचे मतदान केंद्र कुठे आहे हे तुम्हाला आधीच माहीत असल्यास तुम्ही वेळेवर घरातून निघून मतदान केंद्रावर वेळेवर पोहोचू शकाल आणि यानंतर उरलेला दिवसभर सुट्टीचा आनंद घेऊ शकाल. मतदान केंद्राची माहिती ऑनलाइन मिळू शकते. वेबसाइट आणि ॲपवर तुमचे जवळचे मतदान केंद्र कसे शोधायचे ते आपण येथे पाहणार आहोत.
वेबसाईटवर असे शोधा मतदान केंद्र
१. सर्व प्रथम भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाण्यासाठी तुम्हाला https://voterportal.eci.gov.in/ या लिंकला तुम्हाला भेट द्यावी लागेल
२. या वेबसाईटवर तुमचा ई-मेल व फोन नंबर टाकून लॉग इन करा
३. आता तुम्हाला ‘Find Polling Station’ ऑप्शनवर क्लिक करावे लागेल
४. इयानंतर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या काही महत्त्वाच्या डिटेल्स भराव्या लागतील.
५. हे केल्यास तुम्हाला तुमच्या मतदान केंद्राबद्दल माहिती मिळेल.
मोबाईल ॲपद्वारे मिळवा मतदान केंद्राच्या डिटेल्स
वेबसाइट व्यतिरिक्त, तुम्ही स्मार्टफोन ॲपद्वारे तुमच्या मतदान केंद्राची माहिती देखील मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये वोटर हेल्पलाइन ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल. हे ॲप Android आणि iOS दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. या ॲपवर मतदान केंद्र कसे शोधायचे ते जाणून घ्या
१.सर्वप्रथम, तुमच्या फोनमध्ये मतदार हेल्पलाइन ॲप डाउनलोड आणि इन्स्टॉल करा.
२. यानंतर हे ऍप उघडल्यास तुम्हाला ‘find your polling station’ हा ऑप्शन दिसेल
३. येथे तुम्हाला राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ याबद्दल माहिती द्यावी लागेल
४. आता सर्च वर क्लिक करून तुम्ही तुमच्या जवळच्या मतदान केंद्राच्या डिटेल्स तुमच्या फोनवर मिळवू शकता.