लासूर – येथे श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या गेल्या सात दिवसात मोठया उत्साहात सपन्न झाला. यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी सदिच्छा भेट दिली.
या पावन प्रसंगी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाचे श्रवण करून त्यांनी शुभाशीर्वाद घेतले.
ह.भ.प. श्री हरीशरणगिरी महाराज यांच्या प्रेरणादायी व भक्तिरसाने ओथंबलेल्या काल्याच्या कीर्तनाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.
या संपूर्ण सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.

























