वैराग – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकता महिला मंचच्या वतीने मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी ‘ॲटलांस फॅमिली मॉल’ येथे राज्यस्तरीय ‘कर्तबगार महिला पुरस्कार’ वितरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण ७० महिलांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी आयोजित भव्य विक्री प्रदर्शनामुळे महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळून त्यांच्या आत्मविश्वासाला नवे बळ मिळाले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, पोलीस उपनिरीक्षक सिंधू देशमुख, वैद्यकीय अधिकारी विश्वरूपी यादव, ॲटलांस फॅमिली मॉलच्या प्रमुख निर्मला बूथडा, एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर, डॉ. अनुराधा वाघमारे आणि शीतल सुरवसे यांची उपस्थिती होती. मान्यवरांचा यथोचित सत्कार करून कार्यक्रमाची पुढील रूपरेषा मांडण्यात आली.
उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांचे प्रतिपादन
यावेळी बोलताना उपजिल्हाधिकारी अंजली मरोड म्हणाल्या की, “एकता महिला मंचने महिला सक्षमीकरणासाठी हाती घेतलेले कार्य स्तुत्य आहे. आजची नारी कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. सामान्य कुटुंबातील स्त्रियांना पहिल्यांदाच अशा भव्य राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करणे, ही खूप मोठी बाब आहे. या व्यासपीठामुळे महिलांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळत आहे.” त्यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
भव्य प्रदर्शन आणि स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
महिनांना आत्मनिर्भर करण्यासाठी याठिकाणी भव्य विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खाद्यपदार्थ, बेन्टेक्स ज्वेलरी, शोभेच्या वस्तू, विविध मूर्ती आणि हस्तकलेचे स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉल्सवर नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली, ज्यामुळे महिला उद्योजिकांच्या उत्पादनांची भरघोस विक्री झाली. तसेच महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
राज्यस्तरीय ‘कर्तबगार महिला’ पुरस्काराचे मानकरी
विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या खालील ६९ हून अधिक महिलांना सन्मानित करण्यात आले: लक्ष्मी सुतार, रेश्मा मुकटे, जस्मिन शेख, वसुधा कुंभार, गीतांजली जोशी, प्रभावती साबळे, स्वाती शिंदे, स्वाती जोगदंडकर, भाग्यश्री पावले, वंदना घोडके, सानिया सय्यद, स्वाती चव्हाण, कल्पना वाघमोडे, शामबाला सुतार, राजनंदनी हाके, प्रमिला जाधव, आशा चव्हाण, लक्ष्मी संकपाळ, पूजा भोसले, प्रतीक्षा सांगुळे, सुचिता कुटे, शुभांगी अडसूळ, अश्विनी कुडपे, वनिता जगझाप, संगीता कदम, स्वाती भोसले, विमल भोसले, राणी पाटील, महादेवी माने, सविता काजळे, मथुरा दसवंत, सुखनंदा सुरवसे, मनीषा काजळे, अरुणा काजळे, अनिता दसवंत, उज्वला गुरव, प्रियांका शिंदे, मोना मोरे, रत्नप्रभा गायकवाड, गंगा गोडगे, राणी गवळी, रंजना गवळी, अंजुम सय्यद, कलीमा मुलाणी, कोमल वाघमारे, रेश्मा घोडके, राधा नाईकवाडी, क्रांती पाटील, सोनाली मंडलिक, मैना भड, सुवर्णा व्हटकर, साजिदा सय्यद, जयश्री संकपाळ, गीता पाटील, रेणुका चौगुले, सरोजा मते, शामल सुतार, राजश्री चव्हाण, शैला कांबळे, शीला घोडके, ताहिरा मुलाणी, सुरेखा कोळी, सोनाली भोसले, प्रतिभा जगदाळे, तारामती काळदाते, मुस्कान मुलाणी.
यावेळी उपस्थिती एकता महिला मंचच्या तालुकाप्रमुख कविता दसवंत,शितल संकपाळ, सुनिता नवले, शितल खंडागळे, सविता काटे, शीला बनसोडे, मैनाबाई सोनवणे, स्नेहल तळेकर, सरिता कुलकर्णी, स्वाती सुतार, शितल काजळे, दिपाली काजळे, कोमल वायकर, संगिता लांडगे, सविता भड, अयोध्या गुरव, साधना भड, मिरा सुरवसे, शुलन काजळे, कोमल काजळे, संगिता काजळे, सविता दसवंत, उषा ठाकूर, नुरजहा शेख, सविता आपुणे, वर्षा साळुंखे, नलिनी धेंडे, अश्विनी गाढवे, राधा लोखंडे, आशा विभुते, सारिका जाधव, मनीषा गवळी, सोनाली गायकवाड, सुनीता जांभळे, आश्विनी गोडगे, राजश्री बादगुडे, राणी गवळी, पंचशील बनसोडे, वैशाली साळुंके आणि इतर सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शीतल सुरवसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी मानले. या यशस्वी सोहळ्यामुळे बार्शी तालुक्यात एकता महिला मंचच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



























