सांगोला – नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन येथे दि.७ मार्च रोजी पाककला व ग्रुप डान्स स्पर्धेचे तसेच दि.९ मार्च रोजी होम मिनिस्टर, बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती छाया मेटकरी, डॉ.निकिता देशमुख, अपेक्षा पाटील, पं.स.सदस्या राणी पाटील, वंदना शेळके, डॉ.नेहा साळुंखे पाटील, डॉ.मेघना देवकाते, तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, कर्तव्यदक्ष शहर संघाच्या अध्यक्षा सुनंदा घोंगडे व माजी नगरसेविका पूजा पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माजी नगराध्यक्षा राणी माने यांनी कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. मनोगतात निकिता देशमुख यांनी महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत नेहमीच तत्पर असले पाहिजे असे सांगितले. अपेक्षा पाटील यांनी प्रत्येक दिवस महिलांनी स्वतःसाठी जगायला हवा असा सल्ला दिला. डॉ.नेहा साळुंखे-पाटील यांनी महिलांनी आपण स्वतःसाठी काय करू शकतो यासाठी प्रोत्साहन दिले. छाया मेटकरी यांनी सांगोला नगरपरिषद महिलांसाठी नावीन्यपूर्ण कार्यक्रम राबवत असते आणि इथून पुढे ही राबवले जातील असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात केले. याप्रसंगी साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कवयित्री पुष्पा मिसाळ, मनीषा ठोंबरे, अर्चना देसाई, सुवर्णा तेली, हर्षदा गुळमिरे तसेच प्रशासनातील कामगिरीबद्दल सायली पाटील व पाककला स्पर्धेचे परीक्षक तनुजा गवळी, छाया यादव, राजश्री महिमकर, डान्स स्पर्धेचे परीक्षक मृणाल राऊत, शुभांगी पतंगे, सावित्रा कस्तुरे यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुपमा गुळमिरे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेचे कर अधिकारी प्रियांका पाटील, अस्मिता निकम व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेतील विजेते –
पाक कला- अफरीन पठाण प्रथम, मनीषा हुंडेकरी द्वितीय, नीता लाटणे तृतीय, राजाबाई मस्के उत्तेजनार्थ
ग्रुप डान्स- युवा ग्रुप प्रथम, सखी ग्रुप द्वितीय, धुरंदर ग्रुप तृतीय, चौंडेश्वरी ग्रुप उत्तेजनार्थ
होम मिनिस्टर पैठणीच्या मानकरी- नेहा कावळे, पूजा बागडे, ज्योती गोडसे


























