जेऊर – करमाळा येथील कमला भवानी बहुउद्देशीय संस्था संचलित सुरताल संगीत विद्यालयाच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त 11व्या आंतरराष्ट्रीय सूरताल संगीत महोत्सवाचे आयोजन 10 जानेवारी 2026 रोजी गुरुप्रसाद मंगल कार्यालय करमाळा येथे सायंकाळी चार वाजता करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी निशुल्क असणार आहे. या महोत्सवात वेस्ट बंगाल, तेलंगणा, ओरिसा , आसाम, मध्य प्रदेश, गुवाहटी अशा अनेक विविध राज्यातून कलाकार येऊन आपली कला सादर करणार आहेत. त्यामुळे करमाळा वाशियासाठी सुरताल महोत्सव हा कला व संस्कृती ची मेजवानीच ठरणार आहे.
शास्त्रीय उपशास्त्रीय गायन संतूर, तबला वादन तसेच कथक, भरतनाट्यम, ओडिसी, सत्रिय, रवींद्र नृत्य, कठपुतली इत्यादी नृत्यप्रकार ही ऐकायला व पाहायला मिळणार आहेत. या महोत्सवामध्ये अनेक कलाकारांना संस्थेच्या वतीने विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून यावेळी यश कल्याणी सेवाभावी संस्था पुणे यांच्या वतीने देखील कलाकारांना सन्मानित करण्यात येणार आहे.
यामध्ये डॉ. मोनिषा देवी गोस्वामी (गुवाहाटी) यांना सुरताल नृत्य साधना पुरस्कार, गुरु इतिश्री पटनायक (पुरी)- सुरताल नृत्य शिरोमणी पुरस्कार, गुरु श्रुती पंडित (पुणे)- सुरताल नृत्य भूषण पुरस्कार , गुरु सुचरिता घोष (हैदराबाद)- सुरताल नृत्य कलाश्री पुरस्कार, कु. दिपनका शर्मा (इंदौर)- सुरताल नृत्य गौरव पुरस्कार , कु. अभिप्सा नंदी (कोलकाता)- सुरताल कलानिधी पुरस्कार , श्री प्रकाश शिंदे (पुणे)- सुरताल वाद्य साधना पुरस्कार , कु. गितिमा दास (गुवाहाटी)- सुरताल कला गौरव पुरस्कार आणि डॉ. विथीका टिकू (जम्मू कश्मीर) यांना सुरताल कला भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे करमाळा तालुक्यातील ज्या व्यक्तींनी कला ,शिक्षण, योगा या क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी करून राष्ट्रहितार्थ तन-मन धनाने सेवा केलेली आहे अशा व्यक्तींना ही संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यामध्ये आंतरराष्ट्रीय योग पटू डॉ. राधिका तांबे घोलप यांना आंतरराष्ट्रीय योगाचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे . त्याचबरोबर प्राचार्य मिलिंद फंड यांना सुरताल संगीत रसिक पुरस्कार, चित्रकार निवास कन्हेरे यांना सुरताल कला गौरव पुरस्कार, कल्याणराव साळुंखे सर यांना सुरताल संगीत रसिक पुरस्कार, संतोष (राजू) जीवनलाल शियाळ यांना आदर्श व्यापारी सन्मान पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या उत्सवात विद्यार्थ्यांचे गायन वादन आणि कलाकारांची प्रस्तुती अविस्मरणीय असणार आहे. त्यामुळे करमाळा व तालुक्यातील या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केले आहे.


















