बार्शी – मराठी विज्ञान परिषद बार्शी यांच्यावतीने विज्ञान दिनानिमित्त इयत्ता ९ वी मधील विद्यार्थिनींसाठी सायन्स कवीझचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्याध्यक्ष विनायक देशपांडे यांनी विज्ञान विषयाची विद्यार्थ्यामध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी मराठी विज्ञान परिषदेमार्फत सायन्स कवीझचे आयोजन केल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका व विज्ञान शिक्षिका सौ. शुभदा जोशी होत्या. या कवीझमध्ये सेमी इंग्लिश माध्यमाच्या २० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला व विविध प्रश्नांची योग्य उत्तरे दिली.
या स्पर्धेत भक्ती लोलापोड प्रथम, सिद्धी व्हळे- द्वितीय, अक्षता आळे- तृतीय यांनी यश मिळवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदेश घाडगे यांनी केले.

























