पंढरपूर – आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाद्वारा भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची” अंतर्गत दिला जाणारा उत्कृष्ट आरोग्य सेवेचा पुरस्कार पंढरपूर तालुक्यास प्राप्त झाला आहे .
मुंबई येथे आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाद्वारा “भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची” अंतर्गतदिला जाणारा उत्कृष्ट आरोग्य सेवेचा पुरस्कार पंढरपूर तालुक्यास प्राप्त झाला. या पुरस्काराने पंढरपूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दरम्यान हा पुरस्कार आरोग्यमंत्री प्रकाशअबीटकर यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, सिव्हिल सर्जन डॉ. डोईफोडे मॅडम, डॉ.महेश सुडके, डॉ.विजयकुमार सरडे यांनी स्विकारला.
यावेळी आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त, संचालक व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

























