परतूर : प्रतिनिधी
परतूर येथील साईबाबा चौक येथील फिर्यादी नामे सुदर्शन प्रभाकर काथारे रा. चिंचोली यांचे गोडाऊन चे शटर उचकटून आत मध्ये ठेवलेले सोयाबीनचे २२ पोते किंमत ५०,४००/-₹ माल अज्ञात आरोपीने चोरून घेऊन गेले बाबत पोलिस स्टेशन परतूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसानी तपासाचे चक्रे तत्काळ फिरउन सदर गुन्ह्यातील आरोपीची गोपनीय माहिती काढून आरोपी नामे –
१) करण सखाराम पवार वय २४ वर्ष रा. आनंदवाडी.
२) गजानना प्रभू मोरे रा. आनंदवाडी वय ३० वर्ष रा. आनंदवाडी.
३) महेश गणेश कातारे रा. चिंचोली मिळाली यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली सदर आरोपीने मुद्देमाल स्वतः चे पिकिप मध्ये चोरून घेऊन गेले बाबत कबुल केले आणि सर्व मुद्देमाल काढून दिला आहे, चोरीचे सोयाबीन आणि पिकीप अशा एकूण ४,००,४००/-₹ चा मुद्देमाल काढून दिला आहे तो जप्त करून आरोपीस अटक करून PCR घेण्यात आला आहे,
फिर्यादीस अर्ज करून मुद्देमाल परत देण्याची कारवाई पोलिस करीत आहेत, त्यामुळे चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाला याचा आनंद फिर्यादस होत आहे. अजून बरेच गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल,अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम.टी.सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे ,पोका/ सतीश जाधव, दीपक आडे, अच्युत चव्हाण, शामुअल गायकवाड, राम हाडे, दशरथ गोपणवाड, पोह/ अशोक गाढवे चालक धोत्रे यांनी यशस्वी केली आहे.