भोर तालुक्यानंतर बारामती तालुक्यातही विरोधकांकडून पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचे प्रकार सुरू असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. याच संदर्भाने बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बारामती शहराध्यक्ष संदीप गुजर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकीची औपचारिक घोषणा होण्याआधीपासूनच देशभरात चर्चेत राहिलेल्या बारामती मतदारसंघाची निवडणूक आज, मंगळवारी होणार आहे. या वर्षी बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या २३ लाख ७२ हजार असून, त्यापैकी प्रचारात अखेरच्या दिवसापर्यंत रंगतदार ठरलेल्या या लढतीचा सारा कौल आता मतदारांच्या हाती आहे.