Wednesday, February 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पाण्याचे दिवस कमी करण्याचे नियोजन करा : महापौर

तरुण भारतbyतरुण भारत
February 25, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर  : यापूर्वी पाणीपुरवठ्यासाठी अधिकाऱ्यांनी जे मागितले त्या सर्व सुविधा, निधी देण्यात आले आहे. सोलापूर शहराला सुरळीत, वेळेत पाणीपुरवठा करावा. त्याचबरोबर शहरासाठी पाण्याचे दिवस कमी करावेत यासाठी आवश्यक ते नियोजन करा असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान,  प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर पुढील बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी आज पत्रकारांना दिली. 

         सोलापूर महापालिकेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आज सकाळी शहर पाणीपुरवठा संदर्भात महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृहनेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीश पंडित, मनीषा मगर, महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे, उपअभियंता सतीश एकबोटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

       बैठक झाल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली ते पुढे म्हणाले, प्राथमिक स्तरावरील ही बैठक झाली आहे शहराला सुरळीत वेळेत पाणीपुरवठा कसा करता येईल ? याबाबत चर्चा झाली. पाणीपुरवठ्याचे दिवस कमी करणे आवश्यक आहे या संदर्भात सूचना केली आहे. अधिकाऱ्यांनी वेळ मागितली आहे. उन्हाळा तोंडावर आहे. आम्ही निश्चितच पाणीपुरवठा सुधारून दाखवू वेळ द्या. शहरातील वितरण व्यवस्था वाढविण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहे.  उन्हाळ्याच्या तोंडावर दिवस कमी केले तर गोंधळ होऊन पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो,  स्काडा सिस्टीमचा फायदा झालेला आहे. मेन लाईन वरील वॉलसाठी याची मोठी मदत झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

    दरम्यान, पाणीपुरवठा संदर्भात स्काडा सिस्टीम तसेच इतर संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यक अडचणी आणि उपाययोजना सुचविण्यात येतील. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे. या सिस्टीमचेही प्रात्यक्षिक थेट पाहण्यात येणार आहे. त्यानंतर काय करायचे आणि काय नाही यावरही चर्चा होईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.

सात वर्षात 30 हजार नवे नळ कनेक्शन वाढले 

शहरात गेल्या सात वर्षात तीस हजार नवे नळ कनेक्शन वाढले आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. परिणामी शहरासाठी पाणीपुरवठ्याचे दिवस वाढले. उन्हाळा तोंडावर असल्याने पाण्याचे दिवस कमी करण्यात अडचणी येणार आहेत. पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, असेही महापौर विनायक कोंडाल यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी पाणीपुरवठा सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांनी जे – जे मागितले ते – ते देण्यात आले आहे. दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता 1400 कोटीची योजनाही मार्गी लागत आहे, असेही महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले.

एकवट मानधनावर निवृत्त अधिकाऱ्यांना सेवेत घेणार 

सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत , वेळेवर आणि पाण्याचे दिवस कमी करण्यासाठी पाणीपुरवठा विभागासंदर्भातील निवृत्त अधिकाऱ्यांनाही एकवट मानधनावर सेवत घेण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत. त्या अनुषंगाने काही निवृत्त अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे, असेही महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले.

सर्वपक्षीय गटनेत्यांना बैठकीला बोलवावे : अमोल शिंदे 

शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अमोल शिंदे म्हणाले, 

पाणीपुरवठा संदर्भात झालेल्या बैठकीला महापौर यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांना निमंत्रित केले नाही. अशा बैठकींना सर्वांना निमंत्रित करणे गरजेचे आहे. केवळ भाजप पदाधिकाऱ्यांना घेऊन ही बैठक झाली.पाणीपुरवठा हा महत्त्वाचा विषय आहे. लोकांमध्ये या संदर्भात तीव्र भावना आहेत. सोलापूरकरांना या नियोजनाचे कळाले पाहिजे. दुहेरी जलवाहिनीचे काम झाले तरीही शहराचा पाणीपुरवठा सुधारला नाही. अनुभवी निवृत्त अधिकाऱ्यांची मदत घ्यावी.

महापौरांनी यापुढे सर्वपक्षीय गटनेत्यांना बैठकांना बोलावले नाही तर अखेर आयुक्तांसोबत आम्हालाही स्वतंत्र बैठका घ्याव्या लागतील असे सांगतानाच इथे श्रेयवाद महत्त्वाचा नाही. चांगले काम झाले अथवा नसेल तर भाजपाची सत्ता असल्याने त्यांना श्रेय अथवा अपयश स्वीकारावे लागणार आहे, असेही अमोल शिंदे म्हणाले. 

Post Views: 12
Previous Post

एआय तंत्रज्ञान आत्मसात केल्यास उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील 

Next Post

बसस्थानकातील सुविधा व बससेवा वाढवण्याची मागणी; अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बसस्थानकातील सुविधा व बससेवा वाढवण्याची मागणी; अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन

ताज्या बातम्या

तरुण भारतशी अतूट नात… पहिलं वाचलेलं वृत्तपत्र तरुण भारत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 25, 2026

श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये फूड फेस्टिवल

February 25, 2026

मोबाईलच्या प्रकाशाने कीर्ती स्तंभाचे दर्शन; महापालिकेचे दुर्लक्ष

February 25, 2026

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्यावतीनै जल स्वच्छता

February 25, 2026

विकास व वाणिज्य संकुल आराखडा भविष्यकाळाचा विचार करुन व्यापक स्वरुपात करावा

February 25, 2026

श्री विठ्ठल अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा

February 25, 2026

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दोन दिवसीय पद्मश्री पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव

February 25, 2026

रब्बी पिकांचे नुकसान, पंचनामे करण्याची शेतकरी वर्गातून मागणी

February 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0701870

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697