*सोनखेड येथे कृषी दुताकडून वृक्षारोपण व जनावरांचे लसीकरण*
सोनखेड -(तभा वृत्तसेवा )
१ जुलै रोजी सोनखेड येथे कृषी दिनानिमित्त वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करून वृक्षारोपण व
जनावरांचे लसीकरण करण्यात आले.
येथील पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.एम.पुरी यांच्या हस्ते जनावरांना घटसर्प या आजारावर काम करणारे लसीकरण करण्यात आले तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनखेड येथे वसंतराव नाईक जयंती ही वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली. यावेळी वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय येथील विद्यार्थी निखिल केंद्रे,प्रवीण खाकरे,प्रसाद खताळ,कृष्णा लंबे,सम्यक लोहकरे,प्रशांत दस्तरवार यांच्याकडून ग्रामीण जागरूकता कार्यानुभव हा कार्यक्रम राबवण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्रा.डी.जी मोरे,बी.एस.मोरे,बसवंते, बंडेवार व उपसरपंच सुनील मोरे,कविता मुदखेडे,पुष्पा नरवाडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी वर्ग यांची उपस्थिती होती.