तभा फ्लॅश न्यूज/देगलूर : सद्या देगलूर शहरात तसेच तालुक्यात अवैध गुटखा विक्री आणि गुटखा रवाना होतं आसल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांना मिळाली.सदरील मिळालेल्या माहितीनुसार गुन्हें शोध पथकातील अंमलदार यांना पोलीस स्टेशन देगलूर हद्दीत अवैध धंद्यावर कार्यवाही करणे व चोरी करणारे आरोपीचा शोध घेण्याकरिता तात्काळ रवाना झाले होते.
गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी पोलीस स्टेशन देगलूर हद्दीत अवैध संबंधाची माहीती काढत एक बोलेरो जिप क्रमांक MH 28 AZ 0202 हीस चेक केले असता त्यामध्ये आरोपी नामे 1) शेख आफताब शेख गुलाब चय 25 वर्षे 2) शोएब खान शरिफ खान वय 31 वर्षे रा. आजम कॉलनी हिंगोली ता. जि. हिंगोली यांनी त्यांचे ताब्यातील बोलेरो जिप मध्ये मानवी आरोग्यास अपयकारक असलेला व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा कर्नाटकातून हिंगोली कडे जात असलेला 5,88,800/-रु किमतीचा गुटखा व माल वाहतूक करणारी एक बोलेरो जिप क्रमांक MH 28 AZ 0202 अंदाजेत रक्कम 900000/- रु असा एकूण 14,88,800/- रु अशा मुद्देमाला सह मिळून आल्याने त्यांना ताब्यात येवून आरोपीविरुद्ध कायदेशिर कार्यवाही करण्यात आली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा तलवारे यांच्या फिर्यादीवरून शेख अबताब शेख गुलाब( वय 25) आणि शोएब खान,शरीफ खान (वय 31)यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांच्या मार्गदर्शनात कृष्णा तलवारे,वैजनाथ मोटरगे, राजवंतसिंग बुंगई, साहेबराव सगरोळीकर ,रणजीत मुदिराज, नामदेव मोरे, अहमद शेख यांनी ही कारवाई देगलूर- नांदेड रस्त्यावरील लख्खा पाटी जवळ केली. सदरील प्रकरणातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगीरी बद्दल मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कौतुक केले आहे.