सोलापूर – राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त महावितरण सोलापूर मंडळ कार्यालयाच्या वतीने सोलापूर शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ग्राहक जागृतीसाठी स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉलचे जिल्हा ग्राहक मंचाच्या अध्यक्षा तथा सदस्य जिल्हा ग्रा.मं. समिती उद्घाटन श्रीमती भारती सोलवंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याद्वारे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना,मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजना, महावितरण ग्राहकसेवा याविषयी ग्राहकांना माहिती देण्यात आली. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीनकुमार पवार, अशोक निशाणदार, उपकार्यकारी अभियंता महेश पाटील नागनाथ गायाळे यांच्यासह बालाजी धावरकोंडा, राजशेखर गुरव, रिया शेटे, वंदना एकबोटे आदी उपस्थित होते.


























