Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

केळीचे दर अचानक का पडले याची एसआयटीमार्फत चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई द्या –  संजय कोकाटे

तरुण भारतbyतरुण भारत
December 25, 2025
in marathwada
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टेंभुर्णी – ऊस लागवडीच्या कालावधीत राज्य सरकारमधील वजनदार कारखानदार नेत्याने बहुतांश कारखानदारांना हाताशी धरून केळीचे दर पाडून शेतकर्यांचे शेकडो कोटी रूपयांचे नुकसान केले आहे. त्यामुळे सक्षम अधिकाऱ्यांच्या किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या  अध्यक्षतेखाली स्वतंत्र एसआयटी नेमून केळीचे दर का अचानकपणे पडले याचा शोध घेऊन सुनियोजित षडयंत्राचा उलगडा करावा अशी मागणी शिवसेना माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

          या निवेदनात संपर्कप्रमुख संजय कोकाटे म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक राजकारणी हे साखर कारखानदार असल्यामुळे त्यांनी कधीही फळबाग शेतीकडे लक्ष दिले नाही उलट उसाचे क्षेत्र कमी होणार नाही याची काळजी घेतली आहे. तरीसुद्धा सोलापूर जिल्ह्यातील बहाद्दर शेतकऱ्यांनी केळी,आंबा,द्राक्षे,पेरू आणि डाळिंब यांची लागवड करून खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेऊन स्वतःचा आणि परिसराचा विकास केलेला आहे. केळी तर महाराष्ट्रातील एक्सपोर्ट पैंकी 60 टक्के एक्सपोर्ट एकट्या सोलापूर जिल्ह्यातून आखाती देशात निर्यात केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत होते. यामुळेच  वरचेवर उसाची लागवड क्षेत्र कमी होऊ लागले होते उसाची उपलब्धता कमी होत असल्यामुळे स्पर्धा होत आहे व उसास जादा दर द्यावा लागत आहे त्यामुळेच साखर कारखानदार चिंतित झालेले आहेत. 

         ऑक्टोबर नोव्हेंबर ,डिसेंबर हा ऊस लागवडीचा कालावधी असतो व त्याच काळात सुनियोजितपणे सरकारमधील वजनदार कारखानदार नेत्याने बहुतांश कारखानदारांना हाताशी धरून केळीचे दर पाडून शेतकऱ्यांना केळी पिकापासून परावृत्त करण्याचा डाव खेळला गेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. अनेकांनी लागवड केलेले पीक मोडले आहे वर्षभर पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेले पीक मातीमोल भावाने विकावे लागले असून अनेक शेतकर्यांनी केळी पिक मातीत गाडले आहे.

 सध्या बाजारपेठेत केळीची मागणी कमी झालेली नाही अथवा  पुरवठा जास्त झालेला नाही.बाजारपेठेत इतर फळांची उपलब्धता नाही त्यामुळे कुठलेही ठोस कारण नसताना एक्सपोर्ट करणाऱ्या मोठ्या कंपन्या व व्यापाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्यावर दबाव टाकून केळीचे दर दहा दिवसात तीस रूपयांवरून पाच रुपयांवर खाली आणले. शेतकऱ्यांना केळी खोडवा पीक तर फुकट द्यावे लागले किंवा गाडून टाकावे लागले या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. त्यांना काय झालं आणि कशामुळे दर पडले हे कळालेच नाही. गेल्या अनेक वर्षापासून केळीचे पीक घेत असताना असे अचानकपणे कधीच दर पडले नव्हते. शंभर टक्के  घडवून आणलेले षडयंत्र आहे हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलेले आहे आणि हे सर्व साखर कारखानदार लॉबीने केले आहे अशी शंका केळी उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.त्यामुळे सक्षमअधिकाऱ्यांच्या किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या  अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमून केळीचे दर का अचानकपणे पडले याचा शोध घेऊन सुनियोजित  षडयंत्राचा उलगडा करावा तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी निवेदनात केली आहे.

Post Views: 37
Previous Post

महावितरणकडून ग्राहकदिनी जनजागृती

Next Post

संयुक्त विकास आघाडी कडून उमेदवाराच्या मुलाखती

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संयुक्त विकास आघाडी कडून उमेदवाराच्या मुलाखती

ताज्या बातम्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

April 21, 2026

भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त पारंपारीक वाद्यासह मिरवणूक

April 21, 2026

मॉरिशस शांती परिषदेसाठी डॉ.महावीर शास्त्री दाम्पत्यांना आमंत्रण

April 21, 2026

राजेश पवार यांची राष्ट्रीय बंजारा परिषद प्रदेश प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

April 21, 2026

प्रा. चरणसिंह कायटे यांचे दुहेरी यश

April 21, 2026

सोलापूर शहरात पावसाची हजेरी

April 21, 2026

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक – डॉ. नीलाभ रोहन

April 21, 2026

राज्य कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822546

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697