भाऊ नसलेल्या राजश्रीताई बांधतात आदिवासी मुलांना राखी
सलग ८ वर्षांपासून आदिवासी मुलांसोबत रक्षाबंधनाचा सण करतात साजरा
परतूर: प्रतिनिधी
अनु-आदिवासी आश्रम शाळा परतूर येथे (वर्ष 8 वे ) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनचा सण उत्साहात साजरा
सौ.राजश्रीताई शिवहरी डोळे या दरवर्षी अनु-आदिवासी आश्रम शाळा परतूर येथे मुलांना राखी बांधत आहे.
शास्त्रात रक्षाबंधनाचा सण महत्त्वाचा आहे. भावा-बहिणीचे अतूट नाते दर्शवणारा हा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुसाठी प्रार्थना करते. तसेच भाऊही बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
राजश्रीताईला सख्खा भाऊ नसल्या कारणाने त्या मागील 8 वर्षा पासून आदिवासी मुलांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहे.
आज 250 ते 300 भावासोबत हा सण त्या साजरा करत आहे.