Tuesday, July 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

फोटोग्राफी क्षेत्राला लाभली नव “संजीवनी”

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 19, 2024
in solapur
0
फोटोग्राफी क्षेत्राला लाभली नव “संजीवनी”
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छायाचित्र म्हणजे फोटो ही केवळ एक निर्जीव वस्तू नसते, तर ती असते त्या व्यक्तीच्या जीवनातील एक अमूल्य आठवण, छायाचित्रकाराने आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलेली.

आपले, आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे फोटो पाहताना आठवणींचा खजिनाच आपण उघडत असतो. हा खजिना ज्याच्यामुळे जतन करता आला, त्या छायाचित्रकारास मात्र आपण विसरून जातो. या छायाचित्रकारांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि छायाचित्रणास उतेजन देण्यासाठी जगभरात 19 ऑगस्ट हा “जागतिक छायाचित्रण दिन” म्हणून साजरा केला जातो.

यावर्षीच्या जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने आपल्या परळीतील एका अनोख्या छायाचित्रकाराचा परिचय करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. फोटोग्राफी हा पुरुषांची मक्तेदारी असलेला प्रांत. या पुरुषांच्या दुनियेत नवीन कल्पना सोबत घेऊन अत्यंत दमदारपणे आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारी आणि मरगळलेल्या फोटोग्राफी क्षेत्राला नवीन “संजीवनी” देणारी एक उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणजे सौ संजीवनी राम भाले “बेबी मॅजिक” या आपल्या नवजात बाळांच्या फोटोसाठीच वाहिलेल्या फोटो स्टुडिओच्या माध्यमातून आपल्या फोटोग्राफर पतीला समर्थ साथ देत असलेली एक अतिशय चांगली छायाचित्रकार. मोबाईल कॅमेरा मधील क्रांती नंतर ग्राहकांनी फोटो काढण्यासाठी स्टुडिओत जाणे जवळजवळ सोडून दिले आहे.

प्रत्येक जण आपले फोटो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात स्वतःच क्लिक करून हे फोटो सोशल मीडिया द्वारे सार्वजनिक करण्यात आणि आपली कलाकारी दाखवण्यात व्यस्त आहे. हे फोटो जतन करण्यासाठी गुगलने गुगल फोटो फुकटात उपलब्ध करून दिले आहे,त्यामुळे फोटो काढणे हा पूर्वी जसा सोहळा असायचा, तसा तो आता राहिलेला नाही. आपल्या दररोजच्या आठवणी आपण अत्यंत सहजपणे मोबाईल कॅमेऱ्याने टिपून त्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात जतन करून ठेवू शकतो. फोटोग्राफी क्षेत्राला या नवीन बदलांमुळे मरगळ आल्यासारखी वाटत होती. परळीतील उत्कृष्ट फोटोग्राफर असा नावलौकिक असलेले श्रीराम भाले आपल्या भाले फोटोग्राफी या स्टुडिओच्या माध्यमातून परळीकरांना फोटोग्राफीची सेवा देत असताना,

त्यांची पत्नी आपल्या आदिती आणि व्यंकटेश या चिमुकल्यांना सांभाळत आपले आदर्श गृहिणीचे कार्य पार पाडत होती; याचवेळी फोटोग्राफीची आपल्या मनातील आवड ओळखून आणि या क्षेत्रातील बदलांना सामोरे जाण्यासाठी आपल्या पतीशी चर्चा करून फक्त नवजात बालक आणि चिमुकल्यांच्या भावविभोर करणाऱ्या अदा कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी “बेबी मॅजिक” या स्वतंत्र स्टुडिओच्या माध्यमातून परळीकरांना सेवा देण्यास सज्ज झाली, आणि आज या क्षेत्रात स्वतःचे एक स्वतंत्र स्थान या आदर्श गृहिणीने निर्माण केले आहे, ही परळीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. खरे म्हणजे महिलांना स्वतः नटून थटून, स्वतःचेच फोटो काढण्याची हौस असते, त्यासाठी त्या पाहिजे तेवढा वेळ द्यायला तयार असतात. स्वभावतःच सर्व स्त्रियांमध्ये एक कलाकार दडलेला असतो. रंगसंगती बद्दलचे त्यांचे ज्ञान तर प्रत्येक पुरुष मान्य करतो.

आपले हे उपजत गुण ओळखून आणि प्रकाश योजना, बॅकग्राऊंड, फोटोचा ठराविक अँगल या फोटोग्राफी मधील बारकाव्यांचा अभ्यास करून स्वतःचे फोटो न काढता इतर स्त्रियांना आणि बालकांना सजवून त्यांचे अप्रतिम फोटो काढण्याचे कसब संजीवनी भाले यांनी प्राप्त केले आहे. लहान बालकांचे मुड्स सांभाळून, त्यांची योग्य वेशभूषा करून अगदी सहजपणे त्यांचे आईच्या नजरेतून विविध क्षणांचे फोटो त्या टिपतात. यामधील त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते केवळ एक महिना वयाच्या बाळाचेच फोटोशूट त्या करतात. आपल्या या स्वतंत्र स्टुडिओच्या माध्यमातून नवजात बाळांच्या पालकांसाठी, आपल्या बाळाचे लहानपण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा त्यांचा हा “बेबी मॅजिक स्टुडिओ”चा प्रयत्न वरदानच ठरला आहे, यात शंका नाही.

मोठ्या शहरातील आधुनिक स्टुडिओच्या धर्तीवर केवळ लहान बालकांच्या फोटोसाठीचा हा स्वतंत्र स्टुडिओ परळी सारख्या लहान गावात काढणे हे धाडसाचेच काम आहे. पण सौ संजीवनी भाले यांनी ते आपल्या कलेच्या आणि मेहनतीच्या जोरावर शक्य करून दाखवले आहे.
यासोबतच मॅटर्निटी फोटोशूट, ब्रायडल फोटोशूट, मॉडेलिंग फोटोज इत्यादी क्षेत्रात पण त्या सध्या आपले योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने परळीतील या महिला छायाचित्रकारास फोटोग्राफीच्या पुढील प्रवासासाठी अनेक अनेक शुभेच्छा.

शब्दांकन

गोपाळ रावसाहेब आंधळे

Post Views: 46
Previous Post

रक्षा निसर्गाची- रक्षा बंधन

Next Post

भाऊ नसलेल्या राजश्रीताई बांधतात आदिवासी मुलांना राखी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भाऊ नसलेल्या राजश्रीताई बांधतात आदिवासी मुलांना राखी

भाऊ नसलेल्या राजश्रीताई बांधतात आदिवासी मुलांना राखी

ताज्या बातम्या

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

मनपाच्या सभेत अनंत जाधवानी अकुलवार यांना धारेवर धरले #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

खुशखबर जिल्हा रुग्णालयात कार्डियाक केअर युनिट सेवा……

July 21, 2026

‘एक विशेष बाब लिहून बी टू रद्दचा आदेश आला #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

वारी दरम्यान खासगी दवाखाने सुरू राहणार…… #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

राम मंदिर देणगीचे राजकारण करू नका #viral#nationalnews

July 21, 2026

*सावधान ही दृशे तुम्हाला विचलित करू शकतात* समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील तिघांसह सहाजण ठार

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0990164

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!