सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ शांतीसागर मंगल कार्यालयात हिंदुत्ववादी मेळावा संपन्न झाला. राम सातपुते यांनी उपस्थित युवकांमध्ये जोश भरला, हिंदुत्ववादी विषयांवर त्यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी व मशीद पाडून राम मंदिर बांधले या सुडा पोटी आता मशिदितून फतवे काढले जात आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी असून मी स्वतः भारत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगत संविधान बदलण्याची भाषा करत काँग्रेस मते मागत आहेत परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना कुणाच्या बापालाही बदलता येणार नाही उलट काँग्रेसने बाबासाहेबांना पराभूत केले हा इतिहास आहे अशा शब्दात त्यांनी अतिशय तिखट शब्दात काँग्रेसवर टीका केली
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...