सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात येत्या 29 एप्रिल रोजी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ होम मैदानावर सभा होणार आहे. मोदींच्या सभेकडे संपूर्ण सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
त्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांना काऊंटर अटॅक करण्यासाठी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सायंकाळी एकत्रित सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कर्णिक नगर येथील मैदानावर चार वाजता होणार आहे.
याबाबत शिवसेना नेते लोकसभा समन्वयक उत्तम प्रकाश खंदारे, पुरुषोत्तम बरडे, उपनेत्या अस्मिता गायकवाड, शरद कोळी, अजय दासरी, गणेश वानकर, विष्णू कारमपुरी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.