आलिया भट्टची लेक राहा कपूर चालायला लागलीय, तसेच रणबीरचा अॅनिमल सिनेमासुद्धा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या दोन्ही गोष्टींचा आनंद अभिनेत्रीने आपल्या पोस्टमधून व्यक्त केला आहे.
रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट १ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रणबीरच्या या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली. रिपोर्ट्सनुसार, ‘अॅनिमल’ ने पहिल्या दिवशी जवळपास 61 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर त्याची जगभरातील कमाई १०० कोटींच्या पार गेली आहे. विशेष म्हणजे आजचा दिवस रणवीरसाठी दुहेरी आनंद घेऊन आला आहे. कारण २ डिसेंबरला त्यांची मुलगी राहा पहिल्यांदा चालायला शिकली आहे. या खास क्षणासाठी आलिया भट्टने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
पतीसाठी आलिया खूश
एकीकडे ‘अॅनिमल’ने रणबीरला सुपरस्टार सिद्ध केले आहे, तर दुसरीकडे आलिया-रणबीरची मुलगी राहाने शनिवारी पहिले पाऊल टाकले. आलियाने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले. पहिला फोटो ब्लॅक अँड व्हाइट आहे, ज्यामध्ये रणबीर त्याच्या चाहत्यांच्या गर्दीत वेढलेला दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तो राहाला कुशीत घेऊन पुस्तक वाचताना दिसत आहेत. आय लव्ह माय डॅड असे त्या पुस्तकाचे नाव आहे.
फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले – हे त्यासाठी जे तू ऑन आणि ऑफ कॅमेरा आहेस. तुझ्यातल्या संयम, शांती आणि प्रेमासाठी , हे त्याच्यासाठी जो त्याच्या कुटुंबासाठी आहे. कलाकार म्हणून तू केलेल्या मेहनतीसाठी. शिवाय आज तुझ्या मदतीने आपल्या मुलीने पहिले पाऊल टाकले त्यासाठी, तसेच वरील सर्व गोष्टी सोप्या करण्यासाठी… माझ्या लहान ‘अॅनिमल’चे अभिनंदन. पती आणि मुलीसाठी लिहिलेल्या आलियाच्या गोड पोस्टने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
रश्मिकानेही कौतुक केले
‘अॅनिमल’च्या प्रीमियरमध्ये आलिया भट्ट आणि रश्मिका मंदाना यांचा व्हिडिओ समोर आला होता. व्हिडिओमध्ये आलिया दूरुनच रश्मिकाला मिठी मारताना दिसली होती, ज्याला बघून त्यांच्यात काही मतभेद असतील, कदाचित आलियाला रणबीरची ऑन-स्क्रीन पत्नी आवडत नसेल. असे या दोन्ही अभिनेत्रींबद्दल बोलले जात होते. पण त्यांच्यात अजिबात तथ्य नाही.
आलियाने रश्मिकाच्या अॅनिमलमधील अभिनयाचे कौतुक केले आहे. रश्मिकासाठी पोस्ट शेअर करताना तिने लिहिले की, तू खूप सुंदर दिसत आहेस. असे म्हणत अभिनेत्रीचे कौतुक केलेले.