Monday, April 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विठ्ठल रुक्मिणी पादुका विसावा मंदिराचा जिर्णोद्धार हे आमच्या संस्कृतीचे जतन

तरुण भारतbyतरुण भारत
April 13, 2026
in editor
0
विठ्ठल रुक्मिणी पादुका विसावा मंदिराचा जिर्णोद्धार हे आमच्या संस्कृतीचे जतन
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गावरील मध्ययुगीन कालखंडापासूनचा इतिहास लाभलेल्या विठ्ठल रुक्मिणी पादुका विसावा मंदिराचा जिर्णोद्धार म्हणजे आमच्या संस्कृतीचे जतन करणेच आहे, यासाठी सर्वतोपरी सहकार्यास आम्ही कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सदस्य प्रशांतराव परिचारक यांनी केले. विसावा मंदिराच्या जिर्णोद्धार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी वारकरी संप्रदायातील संत मंडळी उपस्थित होती.


यावेळी राणा महाराज वासकर म्हणाले मंदिरासमोरील विहिरीचा जीर्णोद्धार होणे खूप गरजेचे आहे या विहिरीला एक ऐतिहासिक महत्त्व आहे येणाऱ्या महिना वारकरी तसेच वारी मध्ये येणाऱ्या वारकरी यांच्यासाठी या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध होतील  उपलब्ध करून देण्यासाठी त्या पद्धतीने या व्यवस्था व्हावी आश्या भावना व्यक्त केल्या.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला विसावा मंदिराचे विश्वस्त व भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष काशिनाथ थिटे यांनी उपस्थित आमचे स्वागत केले. यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक, शंकर महाराज बडवे, ह.भप.राणा महाराज वासकर, डॉ.प्रशांत सुरू, निवृत्ती महाराज नामदास, बापूसाहेब महाराज देहूकर,  ऋषिकेश उत्पात, मुख्याधिकारी महेश रोकडे, अभयराव वांकरएकनाथ महाराज देशमुख ( जळगावकर ), रंगाप्पाजी, रघुनाथ महाराज कबीर, नागेश महाराज बागडे, समाजसेवक गणेशभाऊ अधटराव, सिकंदर ढवळे,विठ्ठल महाराज चवरे, आबासाहेब महाराज भोसेकर  या मान्यवर व महाराज मंडळीच्या हस्ते नारळ वाढवून जीर्णोद्धार कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.


शंकर महाराज बडवे व ऋषिकेश महाराज उत्पात यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशीर्वचन दिले. या मंदिराचा इतिहास व जिर्णोद्धाराची गरज आपल्या प्रास्ताविकातून पंढरपूर नगर परिषदेचे नगरसेवक व या मंदिराचे विश्वस्त सौरभ थिटे यांनी सांगितल्या. श्री विठ्ठल रुक्मिणी पादुका विसावा मंदिर इसबावी पंढरपूर हे वारकरी संप्रदायामध्ये एक महत्त्वाचे स्थान आहे. भगवंत परमात्मा पांडुरंग संतांना नेण्यासाठी याच ठिकाणी आले, त्यामुळेच भगवंताच्या चरणपादुका या मंदिरामध्ये आहेत. भगवंताची व संतांची भेट या ठिकाणी झाली, त्यांचा विसावा झाला, त्यामुळे याला विसावा मंदिर असेही म्हणतात.


आषाढी वारीमध्ये पूर्ण वारी काळात आषाढी दशमी दिवशी याच ठिकाणी सर्व संतांच्या पालख्या विविध मार्गावरून येऊन विसावा मंदिरापाशी संत भेटीसाठी एकत्र येतात.
कार्तिक पौर्णिमेला संत ज्ञानेश्वर महाराजांची व संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी विसावते. पंढरपूरातील नागरिक वारकरी विसावा मंदिरापर्यंत माऊलींना व तुकोबारायांना निरोप देण्यासाठी येतात.


कोल्हापूर महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जसा किरणोत्सव होतो, तसाच किरणोत्सव विसावा मंदिरामध्ये महाशिवरात्रीनंतर सात ते आठ दिवस होत असतो. असे या मंदिराचे असणारे महात्म्य याप्रसंगी अनेक संत मंडळींनी आपल्या भाषणातून सांगितले. याप्रसंगी ह.भ.प.राणा महाराज वासकर, ह.भ.प.बापूसाहेब महाराज देहूकर, ह.भ.प.निवृत्ती महाराज नामदास, डॉ.प्रशांत सुरू यांनीही मनोगते व्यक्त केली.


मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी पहिल्या टप्प्यातील रंग काढण्याचा पूर्ण खर्च श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान नीरानरसिंहपूरचे विश्वस्त व आळंदी देवस्थानचे पूर्व विश्वस्त डॉ.प्रशांत सुरू यांनी याप्रसंगी समर्पित केला. ते बोलताना म्हणाले या वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वाचे ऐतिहासिक व पुरातन स्थान असलेल्या या विसावा मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी सेवा करण्याची संधी मिळते आहे ही खूप भाग्याचे गोष्ट आहे.

या मंदिराचा जिर्णोद्धार चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी व चांगले संवर्धन होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे
तसेच सुधा मोरे यांनी देखील उत्स्फूर्तपणे पंचवीस हजार रुपयांची देणगी याप्रसंगी समर्पित केली. मंदिर जिर्णोद्धारामध्ये मंदिर मूळ स्वरूपात आणणे, मंदिराच्या कळसाचे काम, तसेच मारुती मंदिराचा जिर्णोद्धार, जवळच असणाऱ्या विहिरीचा जिर्णोद्धार व तेथे येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा या सर्व गोष्टी करण्याचे प्रयोजन असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी या मंदिराचे विश्वस्त अभय शिटे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सचिन लादे यांनी केले. कार्यक्रमास वारकरी सांप्रदायातील मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, इसबावी ग्रामस्थ व वारकरी विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 16
Previous Post

टेंभुर्णी पोलीस ठाणे कडून रूट मार्च व दंगा काबू योजना रंगीत तालीम

Next Post

राज्याची तिजोरी सर्वसामान्यांच्या मालकीची, त्यामुळे पैशावर अधिकार कुणीही सांगू नये

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
राज्याची तिजोरी सर्वसामान्यांच्या मालकीची, त्यामुळे पैशावर अधिकार कुणीही सांगू नये

राज्याची तिजोरी सर्वसामान्यांच्या मालकीची, त्यामुळे पैशावर अधिकार कुणीही सांगू नये

ताज्या बातम्या

बार असोसिएशनच्यावतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

बार असोसिएशनच्यावतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 13, 2026
महात्मा ज्योतीबा फुले जयंती गैबीपीर उर्दू स्कूल येथे साजरी

महात्मा ज्योतीबा फुले जयंती गैबीपीर उर्दू स्कूल येथे साजरी

April 13, 2026

मोहोळ-वैराग मार्गावर जीवघेणा सापळा; रेल्वे पुलाजवळ सिमेंट रस्त्यात उघडे लोखंडी रॉड

April 13, 2026
महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी; सर्वरोग तपासणी शिबिरात ९२ जणांची मोफत तपासणी 

महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी; सर्वरोग तपासणी शिबिरात ९२ जणांची मोफत तपासणी 

April 13, 2026
ध्यान, नियम व सत्कर्मातून भगवंत कृपा; बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर संगीतमय भागवत सप्ताह

ध्यान, नियम व सत्कर्मातून भगवंत कृपा; बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर संगीतमय भागवत सप्ताह

April 13, 2026
आंबेडकर जयंतीत ‘नो डीजे, नो डॉल्बी’; पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य; पोलीस प्रशासनाचे आवाहन

आंबेडकर जयंतीत ‘नो डीजे, नो डॉल्बी’; पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य; पोलीस प्रशासनाचे आवाहन

April 13, 2026
स्वर्गीय आशाताईंचं धाराशिवशी जुळलेलं अनोखं नातं…

स्वर्गीय आशाताईंचं धाराशिवशी जुळलेलं अनोखं नातं…

April 13, 2026
लोकविकास मध्ये क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी

लोकविकास मध्ये क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी

April 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0805856

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697