वेळापूर – रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण विद्यालय, फळवणी येथे शिपाई पदावर कार्यरत असलेले सुनील भोसले यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. संस्थेत तब्बल ३९ वर्षे ६ महिने प्रामाणिक व निष्ठेने सेवा बजावून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात संस्थेच्या व भोसले परिवाराच्या वतीने सुनील भोसले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मिलिंद सरतापे, केदार सर तसेच महिला शिक्षिकांनी मनोगत व्यक्त करत भोसले यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले.
कार्यक्रमास रिपाइं तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, माजी सरपंच सचिन पाटील, रिपाइंचे सुधीर भोसले, युवराज अवताडे, ॲड. आणासो डोंगरे, चेअरमन दत्तात्रय अवताडे, रिपाइं (आठवले) शाखाध्यक्ष महेंद्र धांडोरे, स्कूल कमिटी सदस्य जोतीराम अवताडे,जगन्नाथ वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य अशोक आसबे, कुरबावीचे उपसरपंच यशोदीप दणाने,होळे माजी सरपंच सौ.सुगंधा बाळू लोंढे, तसेच महेंद्र भोसले,अरुण भोसले,संजय खरे, पंकज भोसले आदी मान्यवर उपस्थित होते तसेच
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक केदार सर, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक व भोसले यांचे नातेवाईक-आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.























