समृद्धी साखर कारखान्याने केली वारकऱ्यांच्या पाण्याची सोय
दिंडीसोबत पाठवले पाण्याचे टँकर
तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड घनसावंगी 29 जुलै: दरवर्षी खंड न पडता घनसावंगी तालुक्यातील हजारो वारकरी आषाढी एकादशी यज्ञसाठी पंढरपुरला पायी वारी करत जातात. विठ्ठल भक्तीत तल्लीन होत मैलाचा प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांसोबत समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी पाण्याचे टँकर पाठवले आहे.
घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथील दत्ता महाराज उगले यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी शेकडो वारकरी पायी वारी करत पंढरपूरला जातात. यावर्षी भक्तिमय वातावरणात जिरडगाव येथील वारकरी विठूमाऊलीच्या दर्शनासाठी निघाले. वाटेत त्यांच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून त्यांच्या सोबत सतीश घाटगे यांनी समृद्धी कारखान्याचे पाण्याचे टँकर पाठवले. यामुळे वारकऱ्यांची पाण्याची महत्वाची अडचण दूर झाली आहे.